घरदेश-विदेशइमरान खान यांची अब्रू थोडक्यात वाचली

इमरान खान यांची अब्रू थोडक्यात वाचली

Subscribe

निवडणूकीत इमरान खान यांच्या पक्षाला १७८ मते मिळाली.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी राष्ट्रीय संसदेत बहुमत मिळवले आहे. अविश्वास ठराव प्रस्तावावर शनिवारी झालेल्या संसदीय निवडणूकीत इमरान खान यांनी बहुमत मिळवले आहे. १७८ मते मिळवून इमरान खान यांचा पक्ष जिंकला. इमरान खान यांना ठराव जिंकण्यासाठी १७२ मतांची गरज होती. मात्र इमरान खान यांचा १७८ मतांनी विजय झाला. पाकिस्तानच्या विश्वास दर्शक ठरावात वित्त मंत्री अब्दुल हफीज शेख यांचा पराभव झाल्याने इमरान खान सरकारला राष्ट्रीय संसदेत विश्वास ठराव प्रस्ताव सादर करावा लागला. त्याचबरोबर विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही राष्ट्रीय संसदेत प्रस्ताव सादर केला. निवडणूकीत इमरान खान यांच्या पक्षाला १७८ मते मिळाली.

पाकिस्तानच्या संसदेत पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट या विरोधी पक्षाने पंतप्रधान इमरान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधी पक्षाच्या विरोधामुळे इमरान खान यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे जाणाच्या निर्णय घेतला.

- Advertisement -

इमरान खान हे २०१८ साली पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. त्यांच्या पंतप्रधान पदाला अजून ५ वर्षेही पूर्ण झाली नाहीत. इमरान खान हे सत्तेत येताच त्यांच्या नेतृत्वावर अनेकांनी टिका केली होती. त्याचबरोबर पाकिस्तान सीनेट निवडणूकीत वित्त मंत्री अब्दुल हफीज शेख यांच्या पराभवानंतर इमरान खान यांना मोठ्या संकटाला समोरे जावे लागले. त्यानंतर विरोधी पक्षाने फ्लोर टेस्टचीही मागणी केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Muthoot समूहाचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे दिल्लीत निधन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -