घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, इस्लाम विरोधी बोलणाऱ्यांची हिटलिस्ट तयार

पंतप्रधान मोदी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, इस्लाम विरोधी बोलणाऱ्यांची हिटलिस्ट तयार

Subscribe

बिहारची राजधानी असलेल्या पटणामध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला असून हल्लेखोरांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे उघडकीस आले आहे.

बिहारची राजधानी असलेल्या पटणामध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला असून हल्लेखोरांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी दहशतवाद्यांना १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले असून उदयपूर आणि अमरावतीमधील हत्यांप्रमाणेच मोदींवर हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या एक दिवसा आधी याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. अतहर परवेज आणि मोहम्मद जलाल्लुदीन अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी माहिती देताना अतहरने पोलिसांना सांगितले की या हल्ल्यासाठी २६ जणांचा एक गट तयार करण्यात आला होता. त्यासाठी पटणा य़ेथे त्यांना प्रशिक्षण दिले जात होते. हे सगळेजण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजे PFI आणि सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया म्हणजे SDPI साठी काम करत असल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

हा सर्व खुलासा दहशतवाद्यांकडून मिळालेल्या इंडिया 2047 या दस्ताऐवजातून उघड झाला आहे. यात हल्ल्याच्या पूर्व नियोजनाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार पाटणातील फुलवारी शरीफच्या अहमद पॅलेसमधील दुसऱ्या मजल्यावर दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले होते. यात बिहारच्या बाहेरील लोकही प्रशिक्षणासाठी यायचे. तसेच मोदी यांच्या पाटणा दौऱ्याच्या एक दिवसाआधी ११ जुलै रोजी संध्याकाळी गुप्तचर यंत्रणेला याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या छापेमारीत जलालद्दीन आणि गुलिस्ता गल्लीतून अतहरला अटक करण्यात आली. तसेच यावेळी या दोघांच्या बँक खात्यातून ८० लाखाहून अधिक रकमेची देवाणघेवाण झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच याबदद्ल बोलताना फुलवारी शरीफचे पोलीस अधिकारी मनीष कुमार यांनी सांगितले की हे दोघे मिशन २०४७ वर काम करत होते. भारताला संपूर्ण मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा कट त्यांनी आखला असून याचसाठी मुस्लीम तरुणांना हत्यार चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -