घरताज्या घडामोडीसीमावाद : अमेरिकेने घेतली भारताची बाजू, चीनला कठोर शब्दात सुनावले!

सीमावाद : अमेरिकेने घेतली भारताची बाजू, चीनला कठोर शब्दात सुनावले!

Subscribe

प्रथमच इतक्या कठोर शब्दात चीनला अमेरिकेने फटकारले आहे.

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारतीय- चीन सीमारेषेवर मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला. मात्र या सीमावादानंतर अमेरिकेने भारताला साथ दिली आहे. पूर्व लडाखच्या सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीला अमेरिकेने चीनच्या आक्रमकतेला जबाबदार धरले आहे. भारत-चीन सीमावादाच्या विषयावर व्हाइट हाऊसची आतापर्यंत थोडी सौम्य भुमिका होती. पण प्रथमच इतक्या कठोर शब्दात चीनला अमेरिकेने फटकारले आहे.

भारत- चीन सीमेवर चीनने घेतलेली आक्रमक भुमिका या आधी अनेकवेळा चीनने जगातील अन्य भागातही घेतली आहे. अशा कृतीमधून चिनी कम्युनिस्ट पार्टीचा खरा स्वभाव दिसून येतो” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. १५ जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर परिस्थितीवर अमेरिकेचे अत्यंत बारीक लक्ष आहे. भारत आणि चीन दोघांनी तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीत शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याला आमचा पाठिंबा आहे” असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिवाने म्हटले आहे.

- Advertisement -

APPवरील बंदीला अमेरिकेचं समर्थन

अमेरिकेनेही चीनी app वर डिजिटल स्ट्राईक केलं आहे. अमेरिकन कम्युनिकेशन्स नेटवर्क सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (एफसीसी) ने चीनची हुआवेई (Huawei) टेक्नॉलॉजी कंपनी आणि झेडटीई (ZTE) कॉर्पोरेशन या कंपन्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचं म्हटलं आहे. या कारवाईचा अर्थ असा आहे की बर्‍याच लहान ग्रामीण वाहकांनी वापरलेल्या फेडरल सबसिडी पैशांचा यापुढे या कंपन्यांद्वारे उत्पादित उपकरणे खरेदी करण्यासाठी वापर करता येणार नाही, असं एफसीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.


हे ही वाचा – वडील – मुलीचा तो सायकल प्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -