घरताज्या घडामोडीपेरूमध्ये आणीबाणी लागू, राष्ट्रपती पेड्रो कॅस्टिलोंच्या समर्थनात केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण

पेरूमध्ये आणीबाणी लागू, राष्ट्रपती पेड्रो कॅस्टिलोंच्या समर्थनात केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण

Subscribe

पेरूमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पेड्रो कॅस्टिलो यांची राष्ट्रपती पदावरून हकालपट्टी केल्यापासून पेरूमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पेड्रो कॅस्टिलो यांची राष्ट्रपती पदावरून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून कॅस्टिलो यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत.

पेरूमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पेड्रो कॅस्टिलो यांची राष्ट्रपती पदावरून हकालपट्टी केल्यापासून पेरूमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पेड्रो कॅस्टिलो यांची राष्ट्रपती पदावरून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून कॅस्टिलो यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पेरूचे संरक्षणमंत्री अल्बर्टो ओटारोला यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. (peru emergency pedro castillo violence protest)

पेड्रो कॅस्टिलो यांची राष्ट्रपती पदावरून हकालपट्टी केल्यापासून त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. त्यांच्या या आंदोलना आता हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री अल्बर्टो ओटारोला यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आंदोलकांनी अनेक ठिकाणी रस्ते रोखले आहेत. अनेक ठिकाणी तोडफोड केली आहे. परिणामी या घटनांमुळे देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्याची शक्यताही संरक्षण मंत्री अल्बर्टो ओटारोला वर्तवली. तसेच, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांसोबतच सशस्त्र सेनाही रस्त्यावर उतरली आहे.

- Advertisement -

सध्यस्थितीत पेरूमध्ये अनपेक्षित राजकीय संकट उभे आहे. गेल्या काही दिवसांत एवढा गदारोळ झाला आहे की, तणाव कमी होण्याऐवजी वाढला आहे. दरम्यान, पेरूमधील या वादाचे मूळ पेड्रो कॅस्टिलो हे काही दिवसांपूर्वी या देशाचे अध्यक्ष होते. पेड्रो कॅस्टिलो यांनी बुधवारी नाट्यमयरीत्या देशाला संबोधित करताना आणीबाणी लावत असल्याचे सांगितले आहे. तसेच, विरोधी पक्षांचे वर्चस्व असलेली काँग्रेस आपण विसर्जित करणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्याच्या निषेधार्थ अनेक मंत्र्यांनी पदाचे राजीनामेही दिले होते. घटनात्मक न्यायालयाच्या प्रमुखाने त्यांच्या निर्णयाचा निषेध केला, तर अमेरिकेने कॅस्टिलो यांना आपला निर्णय मागे घेण्याचा आग्रह केला. पण कॅस्टिलो यांच्या घोषणेनंतर काही तासांनी विरोधी पक्षांनी तातडीची बैठक बोलावून त्यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, पेरूमधले बहुतांश पक्ष पेड्रोच्या विरोधात होते, पण इतर अनेक छोटे पक्षही त्यात होते. अशा स्थितीत त्यांच्याविरोधात आणलेला हा महाभियोग निष्फळ ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. असो, याआधीही पेड्रोला हटवण्याचा प्रयत्न अशाच प्रकारे अयशस्वी झाल्याने यावेळीही असेच काही घडेल, असे मानले जात होते. परंतु, येथे परिस्थिती पूर्णपणे उलट झाली आणि 130 सदस्य असलेल्या काँग्रेसमध्ये 101 आमदारांनी पेड्रो यांना पदावरून हटवण्याच्या बाजूने मतदान केले. मतदानादरम्यान महाभियोगाच्या बाजूने 101 मते पडली तर विरोधात फक्त सहा मते पडली.

- Advertisement -

हेही वाचा – तवांग संघर्षानंतर वायुसेनेचा सीमेवर युद्धसराव; सुखोई, राफेल जेटचा 48 तास पॉवर शो

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -