घरताज्या घडामोडी'कोरोना'विरोधातील उपाययोजनांसाठी न्यायालयात याचिका

‘कोरोना’विरोधातील उपाययोजनांसाठी न्यायालयात याचिका

Subscribe

पुरेशी तपासणी आणि वेगवेगळ्या सुविधा नसल्यामुळे तसेच प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याचा धोका आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.

कोरोनाने देशात शिरकाव केल्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या ६० वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर जनहित याचिका दाखल करम्यात आली आहे. कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारकडे उत्तर मागितले आहे. न्यायमुर्ती डी.एन पाटील आणि न्यायमुर्ती सी. हरी शंकर यांच्या खंडपाठाने ही नोटीस केंद्र आणि दिल्ली सरकारला पाठवली आहे. आरोग्य मंत्रालय आणि दिल्ली सरकारने ३० मार्चपर्यंत उत्तर देणे बंधनकारक आहे.


हेही वाचा – Live Update : जर्मनीत ७० लोकांना करोनाची लागण

दरम्यन, ही याचिका अॅड. त्रिवेणी पोटेकर यांनी दाखल केली आहे. पुरेशी तपासणी आणि वेगवेगळ्या सुविधा नसल्यामुळे तसेच प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याचा धोका आहे, असे या याचिकेत म्हटले आहे. वैज्ञानिक पद्धताने उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यात यावा, अशी मागणि देखील या याचिकेत करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -