Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून उत्तर देऊ शकतो, संजय राऊतांना अमित शाहांचे प्रत्युत्तर

कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून उत्तर देऊ शकतो, संजय राऊतांना अमित शाहांचे प्रत्युत्तर

Subscribe

राज्यसभेत फौजदारी प्रक्रिया ओळख विधेयकावर चर्चा सुरु असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून उत्तर देऊ शकतो असे अमित शाह यांनी संसदेत म्हटलं आहे. कायद्याच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरावरुन संजय राऊतांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. तसेच केंद्र सरकार कायद्याचा वापर विरोधकांविरोधात करणार नाही याबाबत डोळ्यात डोळे घालून सांगावे असे आव्हान राऊतांनी दिले होते. यावर अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, एका सदस्याने सांगितले की जर तुम्ही डोळ्यात डोळे घालून उत्तर देऊ शकता?, जर कोणी डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारत असेल तर मी नक्कीच उत्तर देऊ शकतो. माझ्या मनात चोरी नसल्यामुळे मी नक्कीच देऊ शकतो आणि कोणत्याही व्यासपीठावर देऊ शकतो. मी तेच करतो जे माझा आत्मा मला करायला सांगतो अशा शब्दात अमित शाह यांनी राऊतांना उत्तर दिलं आहे.

- Advertisement -

फौजदारी प्रक्रिया (ओळख) विधेयक 2022 वर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना सवाल केला होता. “या कायद्याचा गैरवापर होणार नाही असं तुम्ही आश्वासन देत आहात. तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून सांगाल का या कायद्याचा दुरुपयोग होणार नाही. कायद्याचा दुरुपयोग होत नाही आहे का?” असा आरोप संजय राऊत यांनी राज्यसभेत केला.

शिवसेना संजय राऊतांचे स्वागत करणार

शिवसेना खासदार संजय राऊत गुरुवारी दिल्लीहून मुंबईत दाखल होणार आहेत. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत मुंबईत दाखल होणार आहेत. संसदेच्या अधिवेशनासाठी राऊत दिल्लीत असताना महाराष्ट्रात ईडीने त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. राऊतांचे राहते घर आणि अलिबागमधील ८ प्लॉट जप्त करण्यात आले आहेत. यानंतर राऊतांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेल्या निधीचा अपहार केला असल्याचा आरोप केला आहे. राऊतांच्या आरोपानंतर माजी सैनिकाने सोमय्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राऊत यानंतर मुंबईत दाखल होणार असल्यामुळे शिवसैनिकांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा : नियोजित वेळेच्या एक दिवस आधी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपुष्टात येण्याची शक्यता

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -