घरदेश-विदेशFuel Price Today : 10 दिवसांत पेट्रोल-डिझेल 12 रुपयांनी महागणार! आजचा दर...

Fuel Price Today : 10 दिवसांत पेट्रोल-डिझेल 12 रुपयांनी महागणार! आजचा दर काय?

Subscribe

भारत खरेदी करत असलेल्या कच्च्या तेलाची किंमत 3 मार्च रोजी प्रति बॅरल 117.39 डॉलरवर पोहचली आहे.

नवी दिल्ली: रशिया- युक्रेन युद्धाचे परिणाम आता इंधनाच्या दरावर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने आता देशांतर्गत त्याची झळ सहन करावी लागणार आहे. सध्या बाजारात इंधनाचे दर स्थिर असले तरी येत्या 10 दिवसांत हेच दर 12 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. शनिवार म्हणजे 5 मार्च 2022 चा विचार केल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर होत्या. मात्र विधानसभा निवडणुकांपूर्वी देशात इंधानाचे दर वाढण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जातेय. या निवडणुकांचे निकाल येण्यास अवघे पाच दिवस उरले आहेत. तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या बाजाराने विक्रमी उसळी घेतली आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत इंधनाचे दर मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

भारत खरेदी करत असलेल्या कच्च्या तेलाची किंमत 3 मार्च रोजी प्रति बॅरल 117.39 डॉलरवर पोहचली आहे. सन 2021 नंतर इंधनाची ही सर्वोच्च किंमत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीस जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या होत्या तेव्हा कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 81.5 डॉलर इतकी होती.

- Advertisement -

अशा परिस्थितीत किरकोळ इंधन विक्रेत्यांना हा खर्च वसूल करण्यासाठी 16 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 12 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एका अहवालात म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यामुळे, सरकारी मालकीच्या किरकोळ विक्रेत्यांना खर्च वसूल करण्यासाठी 16 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी इंधनाच्या किमती प्रति लिटर 12.1 ने वाढवाव्या लागतील. त्याचवेळी तेल कंपन्यांचे मार्जिन जोडल्यास यात प्रति लिटर 15.1 रुपयांनी दरवाढीची आवश्यकता आहे.

- Advertisement -

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे दर

दिल्ली
पेट्रोल – 95.41 रुपये प्रति लिटर | डिझेल – 86.67 रुपये प्रति लिटर

मुंबई
पेट्रोल – 109.98 रुपये प्रति लिटर | डिझेल – 94.14 रुपये प्रति लिटर

कोलकाता
पेट्रोल – 104.67 रुपये प्रति लिटर | डिझेल – 89.79 रुपये प्रति लिटर

चेन्नई
पेट्रोल – 101.40 रुपये प्रति लिटर | डिझेल – 91.43 रुपये प्रति लिटर

नोएडा
पेट्रोल – 95.51 रुपये प्रति लिटर | डिझेल – ₹ 87.01 रुपये प्रति लिटर

बेंगळुरू
पेट्रोल – 100.58 रुपये प्रति लिटर | डिझेल – 85.01 रुपये प्रति लिटर

पाटणा
पेट्रोल – 106.48 रुपये प्रति लिटर | डिझेल – 91.63 रुपये प्रति लिटर

लखनौ
पेट्रोल – 95.28 रुपये प्रति लिटर | डिझेल – 86.80 रुपये प्रति लिटर

चंदीगड
पेट्रोल – 94.23 रुपये प्रति लिटर | डिझेल – 80.90 रुपये प्रति लिटर

जयपूर
पेट्रोल – 107.02 रुपये प्रति लिटर | डिझेल – 90.66 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील तेलाची किंमत अशा प्रकारे तपासा

देशातील आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारातील किमतींनुसार इंधन तेलाच्या देशांतर्गत किमती दररोज बदल असतात. या नवीन किमती दररोज सकाळी 6 वाजता लागू होतात. चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही घरबसल्या इंधनाचा खर्च जाणून घेऊ शकता. घरी बसून तेलाची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल मेसेज सेवेअंतर्गत 9224992249 या मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.


डेव्हिस टेनिस चषक; युकी, रामनाथन विजयी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -