घर देश-विदेश Petrol-Diesel rates hiked : पाकिस्तानी सरकारने मध्यरात्री वाढवले पेट्रोल-डिझेलचे दर; जनतेचा आक्रोश

Petrol-Diesel rates hiked : पाकिस्तानी सरकारने मध्यरात्री वाढवले पेट्रोल-डिझेलचे दर; जनतेचा आक्रोश

Subscribe

Petrol-Diesel rates hiked : पाकिस्तानमधील सरकारच्या एका निर्णयामुळे देशातील लोकांकडून आक्रोक व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानचा स्वातंत्रदिन साजरा करण्यात आल्यानंतर सरकारने देशवासीयांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची भेट दिली. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे काळजीवाहू सरकारने पुढील 15 दिवसांसाठी पेट्रोलियम पदार्थांच्या किमती प्रती लिटर 20 रुपयांनी वाढवल्या आहेत. पाकिस्तानच्या इतिहासातील हा उच्चांक आहे. वित्त विभागाने मंगळवारी (15 ऑगस्ट) एक निवेदन जारी करून ही दरवाढ जाहीर केली. पाकिस्तानने यापूर्वी रशियाकडून तेल आयात करण्यावर बंदी घातल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Petrol Diesel rates hiked Pakistani government hiked petrol diesel rates at midnight Public outrage)

हेही वाचा – ‘INDIA’ : मुंबई बैठकीआधीच खडाखडी; काँग्रेस-आपमध्ये ‘या’मुळे वादाची ठिणगी

- Advertisement -

पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारच्या घोषणेनंतर पेट्रोल प्रती लिटर 17.50 रुपये आणि हाय स्पीड डिझेल (HSD) 20 रुपयांनी महागले आहे. नवीन दर आजपासून (16 ऑगस्ट) लागू झाला आहे. नवीन दरांनंतर पेट्रोल 290.45 रुपये आणि डिझेल 293 रुपयांनी महागले आहे. यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी मागील पाकिस्तान लोकशाही चळवळ (PDM) नेतृत्वाखालील सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रती लिटर 19 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या किमतीनंतर देशात महागाई गगनाला भिडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील महागाईने मे महिन्यात विक्रमी 38 टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा निर्णय झाला होता स्थगित

पेट्रोल-डिझेल दरवाढीसंदर्भात 31 जुलै रोजी घोषणा होणार होती, मात्र ऐनवेळी सरकारने हा निर्णय स्थगित केला होता. तेव्हा महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या जनतेवर पेट्रोलचे वाढलेले दर लक्षात घेऊन हा निर्णय मागे घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र 12 ऑगस्ट रोजी त्यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर माजी अर्थमंत्री इशाक दारना यांनी शेवटच्या वेळी अर्थमंत्री म्हणून याची घोषणा केली होती. आयएमएफने पाकिस्तानच्या दरांमध्ये पेट्रोलियम डेव्हलपमेंट लेव्ही (PDL) लादण्यास मान्यता दिल्यानंतर पेट्रोल-डिझेल किमतीतील वाढ थांबवता येणार नाही, असे ते म्हणाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : लहान लोकांवर भाष्य करणार नाही; अजित पवारांवर निशाणा साधताना ‘त्या’ ऑफरवर केले भाष्य

पाकिस्तान अर्थव्यवस्था संकटात 

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अत्यंत वाईट अवस्थेत आहे. आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अनेक वर्षांच्या खराब वित्त व्यवस्थापनामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था या स्थितीला पोहोचली आहे. तसेच, कोविड-19 महामारी, जागतिक ऊर्जा संकट आणि गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये आलेल्या पुरामुळे देशाचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला होता. गेल्या महिन्यात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (IMF) अतिरिक्त तीन अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. यामुळे देशाला वाढत्या विदेशी कर्जापासून तात्पुरता दिलासा मिळू शकेल, असे आर्थिक तज्ज्ञांकडून मानले जात आहे.

- Advertisment -