घरताज्या घडामोडीPetrol-Diesel Price : पेट्रोल १२ रूपये तर डिझेल ९.५ रूपयांनी महागले, पाकिस्तानात...

Petrol-Diesel Price : पेट्रोल १२ रूपये तर डिझेल ९.५ रूपयांनी महागले, पाकिस्तानात तेलाच्या किमती काय?

Subscribe

पाकिस्तानात २०१४ मध्ये पेट्रोलच्या किंमती दुपटीने वाढल्या आहेत. तसेच पेट्रोलनंतर डिझेलच्या दरानेही पेट घेतला आहे. इम्रान खान सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीत आणखी वाढ केली आहे. सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १२.०३ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात ९.५३ प्रतिलिटर रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार डिझेलची किंमत ९.४३ रूपये प्रतिलिटर इतकी आहे.

हाय स्पीड डिझेलची किंमत काय?

पाकिस्तानात पेट्रोलची किंमत आता १४७.८२ रुपये प्रतिलिटरवरून १५९.८६ रूपये प्रतिलिटर इतकी झाली आहे. हायस्पीड डिझेलची किंमत १४४.६२२ रूपयांवरून १५४.१५ रूपये प्रतिलिटर इतकी आहे. तर रॉकेलची किंमत ११६.४८ प्रतिलिटरवरून १२६.५६ रूपये प्रतिलीटर इतकी आहे.

- Advertisement -

२८ फेब्रुवारी पर्यंत लागू राहणार नव्या किंमती ?

पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. नवीन दर तात्काळ लागू होणार आहेत. ट्रीब्यून या वृत्त पत्राने दिलेल्या माहितीनुसार इंधनाचे नवीन दर २८ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहेत. पाकिस्तानचे कॉलमनिस्ट फारूक सलीमच्या माहितीनुसार, पेट्रोलची किंमत २०१४ मध्ये ८२ रूपये लीटर इतकी होती. परंतु आता त्याची किंमत डबल झाली आहे.


हेही वाचा : PUBG Mobile : संपूर्ण जगभरात सर्वात जास्त कमाई करणारा मोबाईल गेम ठरला पब्जी, जाणून घ्या

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -