घरदेश-विदेशबीटा स्ट्रेनच्या तुलनेत डेल्टाविरुद्ध Pfizer, Johnson & Johnson लस अधिक प्रभावी; दक्षिण...

बीटा स्ट्रेनच्या तुलनेत डेल्टाविरुद्ध Pfizer, Johnson & Johnson लस अधिक प्रभावी; दक्षिण अफ्रीकी विशेषज्ञांचे मत

Subscribe

दक्षिण आफ्रिकेत वापरल्या जाणाऱ्या अमेरिकन फार्मा कंपनी फायझर आणि जॉनसन अँड जॉन्सनची कोरोना लस कोरोनाच्या बीटा स्ट्रेनपेक्षा डेल्टा व्हेरिएंटच्या विरूद्ध अधिक प्रभावी आहे. दक्षिण आफ्रिकेत प्रथम बीटा व्हेरिएंट आढळला. या वर्षाच्या सुरूवातीस येथे कोरोनाची दुसरी लाट आली तर डेल्टा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळला आणि त्यांचा सर्वत्र प्रसार होऊ लागला असल्याचे अफ्रीकन तज्ज्ञांनी म्हटले आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या फैलावामुळे दक्षिण आफ्रिकेत सध्या कोरोनाची तिसरी लाट आली आहे. मागील दोन लाटांच्या तुलनेत यावेळी संक्रमण आणि मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे लॉकडाउन निर्बंधात वाढ झाली आहे. शुक्रवारी आरोग्यमंत्री मामामोलोको कुबायी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकार परिषदेत तज्ज्ञांनी सांगितले की, प्रयोगशाळेतील संशोधन आणि क्षेत्र अभ्यास या दोघांच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले या लसी डेल्टा व्हेरिएंट विरूद्ध प्रभावी आहे.

डेल्टा आणि बीटा व्हेरिएंटचा प्रश्न आहे की डब्ल्यू व्हेरिटाच्या विरूद्ध जॉनसन अँड जॉन्सनची कोरोना लस अधिक चांगले कार्य करते आणि वेळेनुसार ती अधिक प्रभावी होतांना दिसतेय, असे दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय संशोधन परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोफेसर ग्लेन्डा ग्रे यांनी सांगितले. ग्रे म्हणाले की अद्यापजॉनसन अँड जॉन्सन लसच्या बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचे दिसत नाही. आतापर्यंतच्या अभ्यासाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, त्यातील एक शॉट आरोग्य कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या दोन डोसप्रमाणे कार्य करत आहेत.

- Advertisement -

विटवाटरसँड विद्यापीठाचे प्राध्यापक पेनी मूर यांनी असे सांगितले की, सध्या अस्तित्त्वात असलेल्या प्रयोगशाळेच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की दक्षिण आफ्रिकेत सध्या वापरल्या जाणाऱ्या या लसी बीटाच्या तुलनेत डेल्टाविरुद्ध प्रभावी ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेत आता डेल्टा व्हेरिएंटची रूग्ण नोंदविली जात आहेत. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेत आपल्याकडे असलेल्या विविध लसी किती प्रभावी आहेत हे जाणून घेणं फार महत्वाचे आहे. ते म्हणाले की बीटा व्हेरिएंटच्या विरूद्ध फायझर लसातील अँन्टीबॉडीज चांगल्या आहेत. यावरून असे स्पष्ट होते की, बीटाच्या स्ट्रेनविरूद्ध लस इतके चांगले काम करणार नाही. पण आता जेव्हा दक्षिण आफ्रिकेतील डेल्टा व्हेरिएंटचा प्रभाव अधिक होत असताना अँटीबॉडीजची संख्या पुन्हा वाढल्याचे समोर आले आहे.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -