देशात Covid-19 Third Wave रोखण्यासाठी तातडीने ‘या ५’ रणनीती आखा; PHDCCIची सरकारला सूचना

coronavirus
coronavirus

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Covid-19 Second Wave) थैमान घातले. पण आता दुसरी लाट मंदावली असून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. देशातील काही राज्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असून अनलॉक केले आहे. पण येणाऱ्या काळात कोरोना तिसरी लाट (Covid-19 Third Wave) येण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार यंत्रणा तयार करत असून तशी पाऊलं उचलली जात आहे. यादरम्यान उद्योग मंडळ PHDCCIने आज सरकारला देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पाच टप्प्यातील रणनीतीवर काम करण्याचा सल्ला दिला आहे. आता या पाच रणनीती काय आहेत ते? पाहा….

पहिली रणनीती

उद्योग मंडळी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्टीने सांगितलेल्या पहिल्या रणनीतीमध्ये असे आहे की, ज्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ५०० हून अधिक आहे, त्या जिल्ह्यात केंद्र सरकारने गाईडलाईन्स अंतर्गत लॉकडाऊन लागू करायला पाहिजे.

दुसरी रणनीती

येत्या ३ ते ४ महिन्यांत कमीत कमी अर्ध्या लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले पाहिजे.

तिसरी रणनीती

मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशा कठोर सूचना लागू करणे. मायक्रो कंटेन्मेंट झोनसाठी कठोर नियम सुनिश्चित करणे. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष संजय अग्रवाल म्हणाले की, अशा सूचना एखाद्या भौगोलिक क्षेत्राच्या आतमध्ये आणि बाहेर फैलावर रोखण्यास मदत करेल.

चौथी रणनीती

पुढील तीन महिने देशाच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांची क्षमता आणि गुणवत्ता युद्धपातळीवर वाढविण्यासाठी समर्पित केले पाहिजे. म्हणजेच मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा वाढवल्या जातील.

पाचवी रणनीती

सरकारने जास्तीत जास्त लोकांचा प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड्स, आयसीयू बेड्स, डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करावी.


हेही वाचा –  Corona: कोरोनानंतर लोकांना त्वचेसह होतोय नखांचा आजार; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका