Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE मोदींची मोठी घोषणा ! १०० दिवसांची कोविड ड्युटी पुर्ण करणाऱ्यांना सरकारी नोकरीत...

मोदींची मोठी घोषणा ! १०० दिवसांची कोविड ड्युटी पुर्ण करणाऱ्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य

डॉक्टर नर्सेस यांच्या डोक्यावरील ओझे थोडे हलके होण्यास मदत होणार

Related Story

- Advertisement -

देशातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या आढाव्यात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशात NEET- PG च्या परीक्षा पुढील चार महिने पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत कोणतीही परिक्षा घेण्यात येणार नाही. त्यामुळे या काळात कोरोनाच्या परिस्थितीत कोविड ड्युटी करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंटर्नशिपचा एक भाग म्हणून प्राध्यापकांच्या देखरेखीखाली कोविड मॅनेजमेंट ड्युटीमध्ये मेडिकल इंटर्नस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे १०० दिवसांची कोविड ड्युटी करणाऱ्या विद्यार्थ्यांला सरकारी नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारकडून पंतप्रधान विशिष्ट कोविड राष्ट्रीय सेवा सन्मानाने देखिल सन्मानीत करण्यात येणार आहे. इंटर्नसमुळे कोरोनाच्या काळात सतत काम करणाऱ्या डॉक्टर नर्सेस यांच्या डोक्यावरील ओझे थोडे हलके होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे नवीन विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन देता येईल.

- Advertisement -

देशात NEET PG च्या परिक्षा पुढील चार महिने पुढे ढकलण्यात आल्याने ३१ ऑगस्ट पर्यंत कोणतीही परिक्षा घेण्यात येणार नाही. मात्र परिक्षा देण्याच्या एक महिना आधी विद्यार्थ्यांना एक महिन्याचा कालवधी देण्यात येणार आहे. अंतिम वर्षांच्या MBBSच्या विद्यार्थ्यांचा उपयोग टेले कन्सल्टेशन म्हणून करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची काळजी घेण्यासाठीही या विद्यार्थ्यांचा वापर होऊ शकतो. B.SC किंवा GNM करणाऱ्या नर्सेस वरिष्ठ डॉक्टरांच्या हाताखाली पूर्ण वेळ कोविड नर्सेस म्हणून काम करु शकतात.

- Advertisement -

कोरोनाच्या या कामात सहभागी होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य लसी देण्यात येईल. कोरोनाच्या काळात आरोग्य सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना देखिल लागू करण्यात येईल. त्याचप्रमाणे आरोग्य, वैद्यकीय विभागातील डॉक्टर, नर्सेस, संबंधित व्यावसायिक आणि इतर आरोग्यसेवा कर्मचार्‍यांची रिक्त पदे ४५ दिवसांच्या आत NHM निकषांवर कॉनट्रॅक्ट बेसिसवर प्रवेश प्रक्रिया केली जाईल. देशातील कोरोना महामारीशी लढण्यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ वाढविण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनंती करण्यात आली आहे.


हेही वाचा – लसींची ताजी मागणी नोंदवली नसल्याचं वृत्त निराधार; केंद्र सरकारने दिलं स्पष्टीकरण

- Advertisement -