घरताज्या घडामोडीVIDEO - शिवरायांच्या चेहऱ्यावर मोदी तर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर शहा

VIDEO – शिवरायांच्या चेहऱ्यावर मोदी तर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर शहा

Subscribe

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॉलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तान्हाजी या सिनेमातील दृष्यांना मॉर्फिंग करुन शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक चित्रफित करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, असं नाव असलेलं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यावरून मोठं वादंग निर्माण झालं. हे वादंग सुरु असतानाच आता पुन्हा एकदा एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॉलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तान्हाजी या सिनेमातील दृष्यांना मॉर्फिंग करुन शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक चित्रफित करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या संघटना कुठे?

‘ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भाजपाच्या सगळ्या नेत्यांना पाठवली आहे आणि आता मी त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली येथे बंद पुकारणारे आता काय प्रतिक्रिया देतात, ते मला पाहायचे आहे. त्यानंतरच आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ. विशेष म्हणजे इतक्या लोकांना ही चित्रफित पाठवली आहे. मात्र, कोणाचीही एका ओळीची प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या’, असा खोचक सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया

पॉलिटिकल किडा या ट्विटर हँडलवर ही चित्रफित केल्यानंतर त्यावर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. ही चित्रफित तत्काळ मागे घ्यावी अन्यथा याचे परिणाम फार वाईट होतील, अशा शेकडो प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

ही चित्रफित भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन केली गेलेली नाही. तसेच या चित्रफितीमध्ये कुठेही भाजपचे नाव देखील नाही. या चित्रफितमध्ये केजरीवाल यांना उदयभान राठोड दाखवले असून नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रफितमध्ये संवाद देखील आहेत. ‘शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे’, असे संवादही यात आहेत. चित्रफितीच्या शेवटी दिल्ली इलेक्शन २०२०, असे इंग्रजीतील वाक्य असून भगव्या झेंड्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा हे तनाजीच्या वेषात आणि त्याच्यासोबत ‘शहा जी’ अशी अक्षरेही या चित्रफितीत झळकताना दिसत आहेत.


हेही वाचा – भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -