घरताज्या घडामोडी46 years of Emergency: मोदी काँग्रेस हल्लाबोल करत म्हणाले की, 'अशा प्रकारे...

46 years of Emergency: मोदी काँग्रेस हल्लाबोल करत म्हणाले की, ‘अशा प्रकारे काँग्रेसने आपल्या लोकशाही आचारांना चिरडले’

Subscribe

आणीबाणी लागू करून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली, असे अमित शहा म्हणाले.

देशात ४६ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी आणीबाणीची घोषणा केली होती. या आणीबाणीला भारतीय इतिहासात काळा दिवस म्हणून ओळखले जाते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ‘आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसांना विसरू शकत नाही. कॉंग्रेसने अशा प्रकारे आपल्या लोकशाही आचारांना चिरडले.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘आणीबाणीच्या काळ्या दिवसांना कधी विसरू शकत नाही. सन १९७५ ते १९७७ दरम्यान संस्थांचा नाश झाला. आता आपण असा संकल्प करू की, भारतीय लोकशाही भावना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि संविधानात नमूद केलेल्या मुल्यांचे पालन करू.’

- Advertisement -

तसेच पुढच्या ट्वीटमध्ये एक इन्स्टाग्रामवरील लिंक शेअर केली आहे. ज्यामध्ये फोटोच्या माध्यमातून आणीबाणी काळात कशावर बंदी घातली होती हे सांगितले आहे. हे ट्वीट करत मोदींनी लिहिले आहे की, ‘अशा प्रकारे काँग्रेसने आपल्या लोकशाही आचारांना चिरडले. यावेळी आम्हाला आणीबाणीला विरोध करणारे आणि भारतीय लोकशाहीचे रक्षण करणारे सर्व महान लोकं आठवतात.’

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करून आणीबाणी भारतीय लोकशाहीतील काळा दिवस म्हटले आहे. त्यांच्या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, ‘१९७५ साली आजच्या दिवशी काँग्रेसने सत्तेच्या स्वार्थापोटी आणि अहंकाराने देशावर आणीबाणी लावली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली. अनेक सत्याग्रहांना काळ्या कोठडीमध्ये कैद करून माध्यमांना टाळे लावले. नागरिकांचे मूलभूत अधिकार हिसकावून घेऊन संसद आणि कोर्टाला नि:शब्द प्रेक्षक बनविले गेले.’

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -