जग कोरोनाशी लढत असताना UN आहे कुठे? मोदींचा संयुक्त राष्ट्रसभेत सवाल!

pm narendra modi at un general assembly

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संयुक्त राष्ट्र अर्थात UN च्या ऑनलाईन झालेल्या महासभेला संबोधताना थेट संयुक्त राष्ट्रालाच सवाल केला आहे. जग कोरोनासारख्या महामारीशी झुंज देत असताना संयुक्त राष्ट आहे कुठे? सगळं जगच गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून कोरोनाच्या विळख्यात आहे. या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनीच केलेल्या कामगिरीवर आपल्या सगळ्यांनाच गंभीर आत्मचिंतन करण्याची गरज आहे’, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले आहेत. तसेच, ‘कोरोनाच्या संकटकाळात भारतातील लस निर्मिती करण्याची क्षमता आणि ती वितरीत करण्याची प्रणाली याचा वापर फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण मानवतेची या संकटकाळात मदत करण्यासाठी वापरली जाईल’, असं आश्वासन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी या जागतिक व्यासपीठावर बोलताना दिलं.

जगातला सर्वात मोठा लस निर्मिती करणारा देश म्हणून भारताकडून मी जगाला हे आश्वासन देऊ इच्छितो की कोरोनाच्या संकटकाळात भारतातील लस निर्मिती करण्याची क्षमता आणि ती वितरीत करण्याची प्रणाली याचा वापर फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण मानवतेची या संकटकाळात मदत करण्यासाठी वापरली जाईल, असं मोदी म्हणाले. ‘भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. आमचा अनुभव आम्ही जगाच्या हितासाठी वापरू. दहशतवाद, तस्करी, अंमली पदार्थ अशा मानवताविरोधी शक्तींविरोधात भारत नेहमी उभा राहील’, असं देखील मोदी यावेळी म्हणाले.