नादच केला थेट ! PM नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, यादी जाहीर

Thane-Diva 5th and 6th railway line inaguration by the PM modi Today
Thane-Diva 5th and 6th railway line inaguration by the PM modi Today

जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. जागतिक पातळीवर नेत्यांच्या पसंतीच्या यादीत ७१ टक्क्यांच्या रेटिंगने मोदींचे नाव अग्रस्थानी आहे. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सच्या जागतिक पातळीच्या १३ नेत्यांच्या यादीत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडन यांचा सहावा क्रमांक आहे, त्यांना ४३ टक्के रेटिंग मिळाली आहे. तर बाइडन यांच्यानंतर कॅनडाचे राष्ट्रपती ट्रुड्रो यांचे नाव आहे, त्यांना ४३ टक्के रेटिंग मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना ४१ टक्के रेटिंग मिळाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली लोकप्रियता ही जागतिक पातळीवर कायम ठेवण्यात पुन्हा एकदा यश मिळवले आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रांस, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, यूनायटेड किंगडम आणि अमेरिका यासारख्या देशातील नेत्यांचे रेटिंग करण्याचे काम या वेबसाईटच्या माध्यमातून होते.

नवीन आकडेवारी ही १३ जानेवारी ते १९ जानेवारी २०२२ च्या आकड्यांच्या आधारे आली आहे. सात दिवसांच्या निकषानुसार ही रेटिंग निश्चित होते. सात दिवसांच्या आकडेवारीनुसार ही रेटिंग जाहीर करण्यात येते. सर्वेक्षणात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रत्येक देशाच्या नुसार ही आकडेवारी वेगवेगळी असते. वर्ष २०२० मध्येही या वेबसाईटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक रेटिंग दिली होती. त्या वर्षात ८४ टक्के रेटिंग देण्यात आली होती. त्यानंतर ही रेटिंग प्रत्येक वर्षी बदलत गेली. मे २०२१ मध्ये यामध्ये घट दिसून आली होती. त्यानंतर ६३ टक्के इतकी पसंतीची टक्केवारी होती.


टेलिप्रॉम्पटर नंतर आता बेटी बचाव, बेटी पटाव….पंतप्रधान मोदींना झालयं तरी काय? व्हिडीओ व्हायरल