घरदेश-विदेशपंतप्रधान आज लाँच करणार इंधन ई २०; ११ राज्यांमध्ये इथेनॉल मिश्रीत पेट्रोल...

पंतप्रधान आज लाँच करणार इंधन ई २०; ११ राज्यांमध्ये इथेनॉल मिश्रीत पेट्रोल मिळणार

Subscribe

पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता सर्वसामन्यांच्या खिशाला ते जड होत आहे. त्यात भविष्यातील पेट्रोल-डिझेलची उपलब्धला आणि प्रदूषण या सर्वांचा विचार करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळुरूमध्ये ई २० लाँच करणार आहेत.

India Energy Week 2023 Bangalore: पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता सर्वसामन्यांच्या खिशाला ते जड होत आहे. त्यात भविष्यातील पेट्रोल-डिझेलची उपलब्धला आणि प्रदूषण या सर्वांचा विचार करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळुरूमध्ये ई २० लाँच करणार आहेत. आजपासून ११ राज्यांमध्ये २०% इथेनॉल असलेले E20 पेट्रोल मिळणार आहे. याशिवाय पंतप्रधान सौरऊर्जेवर चालणारी सोलर कुकिंग सिस्टीमही सादर करणार आहेत.

६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान ‘इंडिया एनर्जी वीक’ साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळुरूमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात पीएम मोदी 20 टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोल लॉंच करून या कार्यक्रमाची सुरूवात करणार आहेत. तसंच कर्नाटकातील तुमाकुरू येथील एचएएलच्या हेलिकॉप्टर कारखानाही देशाला सुपूर्द करतील. हा आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना आहे. २० वर्षांत येथे १००० हून अधिक हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत. ६१५ एकरचा कारखाना सुरुवातीला लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) तयार करेल. LUH हे स्वदेशी बनावटीचे आणि विकसित केलेले ३ टन श्रेणीचे सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आहे. सुरुवातीला या कारखान्यात दरवर्षी सुमारे ३० हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत. त्यानंतर दरवर्षी त्याची क्षमता ६० ते ९० हेलिकॉप्टरच्या दराने वाढवता येईल. LUH ची फ्लाइट टेस्ट झाली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमामध्ये हरित ऊर्जेशी संबंधित अनेक उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. देशातील स्वच्छ इंधनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधान मोदी ग्रीन व्हेइकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील.

काय आहे चालणारी सोलर कुकिंग सिस्टीम?
प्रधान मंत्री इंडियन ऑइल द्वारे इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीमचे ट्विन कूकटॉप मॉडेल हे एक क्रांतिकारी इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीम आहे. ते एक उत्तम कुकिंग ऑप्शन असेल. यामध्ये सौरऊर्जा आणि सहाय्यक उर्जा दोन्ही वापरून अन्न शिजवता येईल.

- Advertisement -

भारत ऊर्जा महासत्ता बनेल
पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने, IEW चे उद्दिष्ट आहे की, जगातील ऊर्जा क्षेत्रातील महासत्ता म्हणून भारताची क्षमता प्रदर्शित करणे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यावरही चर्चा केली जाणार आहे. यामध्ये पारंपरिक ऊर्जा उद्योग, सरकार आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित नेत्यांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.

पंतप्रधान मोदींनी रविवारी ट्विट करून कर्नाटक दौऱ्याची माहिती दिली. “मी उद्या कर्नाटकात आहे. बंगळूरुला पोहोचल्यावर, मी ‘इंडिया एनर्जी वीक 2023’ मध्ये सहभागी होणार आहे. यानंतर मी तुमकुरू येथे जाऊन अनेक विकास कामांचे लोकार्पण करीन आणि अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार आहे.” असं या ट्विटमध्ये लिहिलंय.

सध्याच्या वाहनांसाठी किती फायदेशीर?
E20 पेट्रोल-इथेनॉल इंधनावर धावू शकतील, अशा फारशा कार सध्या भारतीय रस्त्यावर नाहीत. आत्तापर्यंत, Hyundai Motors कडील Creta, Venue आणि Elsewhere SUV ही एकमेव वाहने आहेत जी ई 20 पेट्रोल मिक्सवर चालवू शकतात. ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये टाटा मोटर्सने त्यांचे दोन नवीन टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन लाँच केले.”

टाटा कंपनी सांगितले होते की, त्यांच्या हॅरियर आणि सफारी एसयूव्हीला लवकरच ई20 इंधन इंजिन मिळतील. एप्रिल २०२३ पर्यंत, महिंद्रा, मारुती सुझुकी, किआ आणि इतर ब्रँड्स देखील फ्लेक्स इंधन इंजिन असलेली वाहने तयार करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -