घरमनोरंजनभारतीय संगीतकार रिकी केज यांनी तिसऱ्यांदा पटकावला ग्रॅमी पुरस्कार

भारतीय संगीतकार रिकी केज यांनी तिसऱ्यांदा पटकावला ग्रॅमी पुरस्कार

Subscribe

भारतीय संगीतकार रिकी केज यांनी यंदा त्यांच्या ‘डिव्हाईन टाइड्स’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. संगीतप्रेमींसाठी मानाचा मानला जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला असून या सोहळ्यात भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. त्यांच्या अल्बमला ‘सर्वोकृष्ट इमर्सिव ऑडियो अल्बम’ या श्रेणीसाठी नामांकित करण्यात आलं होतं. तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे हे एकमेव भारतीय आहेत.

65 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात रिकी केज यांच्या अल्बमसोबत क्रिस्टीना एगुयलेरा, द चॅनस्मोकर्स , जेन इराब्लूम, आणि निडारोसडोमेन्स जेंटेकोर अँड ट्रॉनडेहाइमसोलिस्टिन हे देखील नामांकित होते. मात्र, या सर्वांना मात देत रिकी केज यांच्या अल्बमने पुरस्कार पटकावला आहे.

- Advertisement -

रिकी केज यांनी ट्वीट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे. सोबतच त्यांनी प्रतिष्ठित ब्रिटीश रॉक बँड द पुलिस ड्रमर स्टीवर्ट कोपलँडसोबत आपला पुरस्कार शेअर केला आहे. यापूर्वी 2015 मध्ये देखील पहिला ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे.


हेही वाचा :

शाहरुखच्या चाहतीला नाही आवडला ‘पठाण’, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -