घरताज्या घडामोडीPNB Scam: नीरव मोदी यांच्या पत्नीविरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट

PNB Scam: नीरव मोदी यांच्या पत्नीविरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट

Subscribe

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी हिच्या विरोधात इंडिटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस म्हणजे आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट म्हणून ओळखले जाते.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याची आणि त्याच्या कुटुंबियांची मनी लॉडंरिगच्या संशयाने तपास सुरू आहे. याच प्रकरणी मिसेस मोदीं विरोधात नोटीस बजावण्याची विनंती ईडीने इंटरपोलला केली होती. त्यानुसार आज इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे.

- Advertisement -

जानेवारी २०१८ मध्ये नीरव आणि  मोदी भारतातून पळून गेले होते. त्यानंतर नीरवला गेल्या वर्षी लंडनमध्ये अटक झाली. सध्या तो वॉडर्सवर्थ तुरूंगात आहे. भारतात प्रत्यार्पण होऊ नये, म्हणून नीरव कायदेशीर लडाई लढत आहे. २७ ऑगस्टपर्यंच कोठडी सुनवण्यात आली आहे. नीरवला अटक होण्यापूर्वी मिसेस मोदी अमेरिकेत पळून गेल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. नीरव मोदीने पीएनबी बँकेतून कर्ज काढण्यासाठी स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांची मिसेस मोदी संचालक आहे.

३२९.६६ कोटींची संपत्ती ‘ईडी’ने केली जप्त

या मध्ये मुंबई, दुबई आणि लंडनमधील फ्लॅटचा समावेश आहे. त्याचबरोबर अलिबागमधील फार्म हाऊस. मुंबईतील विशेष न्यायालयाने ८ जून रोजी झालेल्या सुनावणीत नीरव मोदीची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ‘ईडी’ला दिले होते. त्यानुसार आज ‘ईडी’ने जप्तीची कारवाई केली आहे. त्याचबरोबर वरळीतील ‘समुद्र महल’ या इमारतीतील नीरव मोदीच्या मालकीचा एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. हा फ्लॅट चार फ्लॅट्सचा मिळून तयार करण्यात आला होता. याची किमती काही कोटींच्या घरात आहे. तसेच नीरव मोदींची बँक खाते देखील गोठवण्यात आल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे. या सर्वांचे मूल्य ३२९.६६ कोटी आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Video: सायकल घेण्यास कुटुंबीयांनी नाकारले, म्हणून ८वीच्या मुलानं केला इंडियन जुगाड!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -