घरताज्या घडामोडीसुट्टीच्या कारणामुळे हेड कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या!

सुट्टीच्या कारणामुळे हेड कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या!

Subscribe

गुरुवारी दुपारी पोलीस लाईनच्या बॅरेकमध्ये हेड कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. सुट्टीच्या कारणामुळे ते बराच काळ डिप्रेशनमध्ये होते. अलीकडेचे ते दहा दिवसांची सुट्टी घेऊन पिलीभीत येथील आपल्या घरी गेले होते. परंतु आजारामुळे ते आणखी दहा दिवस गैरहजर राहिले होते. पुन्हा मग ते बुधवारी रात्रीपासून कामावर रुजू झाले. पण गुरुवारी दुपारी हेड कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याचे समजल्याने पूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आयजी आणि एसएसपी यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पिलीभीतला जाऊन नातेवाईकांना यासंदर्भात माहिती दिली.

माहितीनुसार, सुट्टीच्या कारणामुळे हेड कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. आत्महत्या करणारे हेड कॉन्स्टेबल मजहर हुसैन (वय ५५) मुळचे बरेली येथील कुलडियातील अटंगा चांदपुर ठाणे येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी झरीन बेगम, मुलगी रितू आणि दोन मुले असा परिवार आहे. सध्या हे कुटुंब पिलीभीत येथील छोटा खुदागंज सेंट अलाइसेस शाळेजवळ राहते. पत्नी पिलीभतच्या मरौरी डेव्हलपमेंट ब्लॉकमध्ये सहाय्यक पदावर कार्यरत आहे. त्याच्या भाऊ कमरुल यांच्या म्हणण्यानुसार, ‘मजहर काही काळ डिस्प्रेशनचा बळी होता. पिलीभीतच्या धनवंतरी रुग्णालयातही त्यांच्यावर उपचार सुरू होते.’

- Advertisement -

मजहर दहा दिवसांची सुट्टी घेऊन पिलीभीतला घरी गेले होते. परंतु आजरपणामुळे आणखी दहा दिवस गैरहजर राहिले. बुधवारी ते कामावर रुजू झाले. पण गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी बॅरेकमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. माहिती मिळताच आयजी रमीत शर्मा आणि एसएसपी प्रभाकर चौधरी घटनास्थळी पोहोचले. घटनेचे माहिती घेतली आणि फॉरेन्सिक टीमनेही पुरावे गोळा केले.

पोलीस दलात सुट्टीबाबत पोलीस कर्मचारी बऱ्याचदा अस्वस्थ दिसतात. सुट्टी न मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना सध्या समोर येत आहेत. सुट्टीच्या कारणामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तणावाच वातावरण आहे. २० दिवसांपूर्वी बदाऊंमधील एका हवालदाराने सुट्टी न मिळाल्यामुळे नाराज झाला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षकांवर गोळी झाडून त्या हवलादाराने स्वतःवर गोळी झाडली. ही संपूर्ण घटान उजनी कोतवालीमध्ये घडली होती. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पैशांच्या व्यवहारावरून वाद-विवाद; निवृत्त नौदल अधिकाऱ्याची हत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -