घरदेश-विदेशनेते, संरक्षण संस्था आयसिसच्या रडारवर; NIAचा मोठा खुलासा

नेते, संरक्षण संस्था आयसिसच्या रडारवर; NIAचा मोठा खुलासा

Subscribe

उत्तर प्रदेशातील दहशतावाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर एनआयएनं मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे.

उत्तर प्रदेशातील दहशतावाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर एनआयएनं मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. देशातील राजकीय नेते, काही महत्त्वाच्या व्यक्ती आणि संरक्षण संस्था या दहशतवाद्यांच्या रडारवर होत्या अशी माहिती NIAनं दिली आहे. पत्रकार परिषद घेत एनआयएच्या पोलीस महानिरिक्षकांनी ही माहिती दिली आहे. NIAनं दिल्ली आणि उत्तरप्रदेशातील १७ ठिकाणी आज (बुधवारी ) छापे टाकले. त्यानंतर आयसिस या दहशतवादी संघटनेच्या ‘हरकत-उल-हर्ब-इस्लाम’ या नव्या मॉडेलचा खुलासा झाला.  मुफ्ती सोहेल असं आयसिसच्या नव्या म्होरक्याचं नाव आहे. तो ‘हरकत-उल-हर्ब-इस्लाम’ या मॉडेलची जबाबदारी सांभाळतो. दरम्यान,  मुफ्ती सोहेल मुळचा उत्तरप्रदेशातील अमरोहा येथील रहिवासी आहे. दहशतवाद्यांचं सारं काम पाहता मोठ्या घातपाताच्या तयारीमध्ये दहशतवादी होते ही बाब देखील स्पष्ट होते.

- Advertisement -

दिल्लीच्या सीलामपूर आणि उत्तर प्रदेशातील अमरोहा, हापूर, मीरत आणि लखनऊ या भागात NIAनं छापे मारले. त्यावेळी स्फोटकांचं साहित्य, दारूगोळा आणि देशी बनावटीचे रॉकेट लॉन्चर जप्त करण्यात आले. शिवाय, ७.५ लाख रुपये रोख रक्कम, १०० मोबाईल, १३५ सिम कार्ड्स, लॅपटॉप आणि मेमरी कार्ड देखील जप्त करण्यात आले आहेत. अद्याप देखील काही भागात NIAकडून छापेमारी सुरू आहे. दरम्यान, १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वाचा – एनआयएचे १६ ठिकाणी छापे; ५ जण ताब्यात; इसिसचा कट उधळला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -