घरताज्या घडामोडीPooja Singhal Case : झारखंडमध्ये ६ ठिकाणी तर बिहारमध्ये EDची छापेमारी, मोठा...

Pooja Singhal Case : झारखंडमध्ये ६ ठिकाणी तर बिहारमध्ये EDची छापेमारी, मोठा पुरावा मिळण्याची शक्यता

Subscribe

मनी लाँड्रिंग आणि वेतनापेक्षा आधिक मालमत्ता प्रकरणात अटक करण्यात आलेल्या झारखंडच्या निलंबित आयएएस अधिकारी पूजा सिंघल (IAS Pooja Singhal Case) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ईडीचे पथक सिंघल यांच्याविरोधात आणखी पुरावे शोधत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी ईडीने ( ED Raid) झारखंडमध्ये ६ ठिकाणी तर बिहारच्या मुजफ्परपुरमध्ये एका ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. या ठिकाणी सिंघल यांच्याविरोधात मोठे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.

आयएएस अधिकारी पूजा सिंघल (Jharkhand IAS) यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. यापूर्वीसुद्धा बिहारमधील मुजफ्परपुरमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा मुजप्फरपुरमध्ये छापेमारी करण्यात येत आहे. यावेळी ईडीला अधिक माहिती तपासात मिळण्याची शक्यता आहे. निलंबित IAS पूजा सिंघल यांचे बिहार कनेक्शन आहे. त्यांचे बिहारमधील मुझफ्फरपूर येथे सासर आहे. मुझप्फरच्या मिठनपुरा जगदीशपुरी परिसरात त्यांचे घर आहे.

- Advertisement -

पूजा सिंघल यांना अटक

निलंबित आयएएस अधिकारी पूजा सिंघल सध्या कोठडीत आहे. निलंबित आयएएस पूजा सिंघल आणि तिचे सीए सामून यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. त्या सध्या होटवार तुरुंगात आहेत.

पूजा सिंघल सध्या कोठडीत आहे. निलंबित आयएएस पूजा सिंघल आणि तिचे सीए सामून यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. यादरम्यान, ईडीने कोर्टाकडे पूजा सिंघलच्या सहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु २० मे रोजी न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी मंजूर केली होती. सीए सुमन होटवार तुरुंगात आहेत. त्यांना झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात मनरेगा निधीच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणेने अटक केली होती. ईडीने छापेमारीदरम्यान त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमार यांच्या घरातून सुमारे १९ ते २० कोटी रुपये वसूल केले होते.

- Advertisement -

हेही वाचा : karnataka Road Accident : कर्नाटकच्या हुबळीमध्ये भीषण रस्ते अपघात; 7 जणांचा मृत्यू, 27 जखमी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -