घरताज्या घडामोडीआप नावाच्या पार्टीचे १२ वाजले, तर मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार; फडणवीसांचा...

आप नावाच्या पार्टीचे १२ वाजले, तर मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार; फडणवीसांचा दावा

Subscribe

गुजरातमध्ये भाजपाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. याचा अर्थ गुजरातच्या जनतेला हा विश्वास आहे की, गुजरातमध्ये जे परिवर्तन झालं ते मोदींनी आणि भारतीय जनता पक्षाने केलं. पुढेही भारतीय जनता पार्टी गुजरातच्या हिताचे निर्णय घेईल. मोदीजींच्या नेतृत्वातच देश पुढे जाऊ शकतो, हा विश्वास गुजरातच्या जनतेने निवडणुकीच्या माध्यमातून दाखवला आहे. ५२ टक्के मतं भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत. तर सध्याचा ट्रेंड पाहिला असता १५७ जागांवर भाजपा आहे. काँग्रेसच्या आजपर्यंतच्या इतिहासात काँग्रेस खाली असून १६ जागांवर आहे. तर ज्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला होता. तसेच आम्ही निवडून येणार असं लेखी दिलं होतं. अशा आप नावाच्या पार्टीचे १२ वाजले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे. त्यामुळे आप पार्टी ही दिल्लीपुरता मर्यादित आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मी गुजरातच्या जनतेचे अभिनंदन करतो. मी देखील प्रचाराला गेलो. तेव्हा जनतेचा मूड स्पष्टपणे दिसत होतो. गुजरात मोदीमय आणि भाजपमय होतं. निवडून आलेल्या सर्व आमदारांना मी शुभेच्छा देतो, असंही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्याकडे एक अस्त्र आहे. ते ब्रह्मास्त्रापेक्षाही जास्त प्रभावी आहे ते म्हणजे टोमणे अस्त्र. टोमणे मारल्याशिवाय त्यांचं कुठलंही वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. उद्योगाचं महत्त्व उद्धव ठाकरेंना कळायला लागलं याचा मला आनंद आहे. कारण महाराष्ट्रातले उद्योग घालवणारे तेच आहेत. रिफायनरी सारखा प्रोजेक्ट त्यांनी बाहेर घालवला. मुंबई महानगरपालिकेवर भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आणि मित्र पक्ष, अशी आमची महायुती आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा निश्चितपणे लागेल असा मला ठाम विश्वास आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये अपेक्षित मतं हे भाजपाला मिळालेलं नाहीये. हिमाचल प्रदेशमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलतं ही तिकडची प्रथा आहे. हा ट्रेंड आम्ही रोखू शकू अशी आम्हाला अपेक्षा होती. हिमाचल प्रदेशमध्ये ४२ टक्के मतं भाजपाला मिळाली आहेत. परंतु १ टक्क्यांपेक्षा जास्त मतं ही काँग्रेसला मिळाली आहेत. परंतु आता भाजपला मतंही त्याठिकाणी चांगली मिळाली आहेत. परंतु भाजपा अजून त्याठिकाणी अधिक मेहनत करेल, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

कर्णाटक बँकेला खाती देण्याचा निर्णय मविआनं घेतला होता. २१ डिसेंबर २०२१ला कर्णाटक बँकेशी करार झाला होता. महाराष्ट्र-कर्नाटकात अशांतता पसरवण्यासाठी काहीजण कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांच्या जीविताचं रक्षणं करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. कोणत्या प्रकारचे फोन येत आहेत, याबाबत आम्ही पोलिसांना माहिती देऊ आणि सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल, असंही फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : गुजरात निकालावरून अजित पवार म्हणतात, निवडणूक आयोगाकडून अधिकृत आकडेवारी आल्यानंतरच


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -