घरदेश-विदेशकाहीतरी शिजतंय! तिसरी आघाडी नाही पण पवार-प्रशांत किशोर यांच्यात तिसऱ्यांदा बैठक

काहीतरी शिजतंय! तिसरी आघाडी नाही पण पवार-प्रशांत किशोर यांच्यात तिसऱ्यांदा बैठक

Subscribe

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील ही तिसरी भेट आहे. दोन्हीही नेते तिसऱ्या आघाडीचा विषय अजेंड्यावर नसल्याचं सांगत आहेत. मात्र, प्रशांत किशोर यांनी आज पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतल्याने या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक येथे भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार दिल्लीत आल्यानंतर २१ जून रोजी दुसऱ्यांदा प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, आज पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची दिल्लीतील ६, जनपथ येथील निवासस्थानी भेट घेतली. दोन्हीही नेते तिसऱ्या आघाडीचा विषय हा अजेंड्यावर नसल्याचं सांगतात. मात्र तरीदेखील या दोघांमध्ये गाठी-भेटीचं सत्र सुरु असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या ४८ तासांमधील शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची ही दुसरी भेट आहे. तर पंधरा दिवसातील ही तिसरी भेट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

- Advertisement -

या चर्चांना वेग आला कारण काल शरद पवारांच्या निवासस्थानी १५ नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीत काँग्रेस नसल्याने काँग्रेस विरहीत तिसरी आघाडी तयारी केली जात असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत तिसऱ्या आघाडीसंदर्भात बैठक नव्हती असं सांगितलं. तसंच काँग्रेस शिवाय आघाडी होऊ शकत नाही, असं स्पष्ट केलं. याशिवाय, प्रशांत किशोर यांनी देखील तिसरी, चौथी आघाडीने काहीच होणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे या शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचं सत्र का सुरु आहे? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -