घरताज्या घडामोडीकाँग्रेसची ऑफर नाकारल्यानंतर प्रशांत किशोर यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, राहुल गांधींची प्रतिमा...

काँग्रेसची ऑफर नाकारल्यानंतर प्रशांत किशोर यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, राहुल गांधींची प्रतिमा…

Subscribe

काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची ऑफर नाकारल्यानंतर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या भविष्याबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. देशातील सगळ्यात जुना पक्ष स्वतःला पुनरुज्जीवित करण्यास सक्षम आहे आणि काँग्रेसला इतर कोणाची गरज नाही. तसेच त्यांनी ‘काँग्रेस नेतृत्व आणि पक्षाच्या भविष्यातील योजनांबाबत अनेक गोष्टींवर सहमती दर्शवली आहे. काँग्रेस स्वबळावर काम करू शकते, एवढे मोठे नेते त्यांच्याकडे आहेत. त्यांना माझी गरज नाही. मला पक्षात येण्याची ऑफर दिली आणि मी नाकारली असे प्रशांत किशोर म्हणाले आहेत. खासदार राहुल गांधी यांची राजकारणातील प्रतिमा सुधारली जाऊ शकते असेही प्रशांत किशोर म्हणाले.

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी एका खासगी वृत्तवाहनीला मुलाखत दिली होती. यामध्ये प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसमध्ये मला कोणतीच भूमिका नको आहे. परंतु काँग्रेसनं मी तयार केलेली ब्लू प्रींटवर काम करुन ती अंमलात आणावी अशी माझी इच्छा आहे. त्यामध्ये जे काही मला सांगायचे होते ते मी सांगितले आहे. 2014 नंतर प्रथमच काँग्रेसने आपल्या भविष्याबाबत संरचित पद्धतीने चर्चा केली आहे. काँग्रेसमध्ये मला काही शंकासुद्धा आहेत. मी काँग्रेसचा भाग बनून काँग्रेसला पुनरुज्जीवीत करण्यासाठी मदत करावे अशी त्यांची इच्छा आहे.

- Advertisement -

राहुल गांधींची प्रतिमा सुधारली जाईल

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची डागळलेली प्रतिमा पुन्हा सुधारली जाऊ शकते असे म्हटलं आहे. भाजपच्या आरोपांमुळे राहुल गांधींची प्रतिमा डागळली आहे. ‘2002 पासून आतापर्यंत पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेत झालेला बदल बघता हे नक्की शक्य आहे. दरम्यान प्रशांत किशोर म्हणाले की, मी काँग्रेसचा भविष्यातील आराखडा तयार करण्यासाठी आणि सुचवण्यासाठी मी पक्षाकडून एकही पैसा घेतला नसल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.

पार्टी नेतृत्वाबाबत राहुल आणि प्रियांकांचा विचार नाही

काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत प्रशांत किशोर यांनी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रशांत किशोर म्हणाले की, “पक्षाला देण्यात आलेल्या नेतृत्वाच्या सूत्रात राहुल यांचे नाव किंवा प्रियंका गांधी यांचे नाव नव्हते. परंतु मी काँग्रेसला वैयक्तिकरित्या काय प्रस्ताव दिला हे सांगू शकत नाही. ‘काँग्रेस पक्षात राहुल गांधींचे स्थान ठरवणारा मी कोण?’ असे राहुल गांधी म्हणाले. तसेच राहुल गांधी हे आपले मित्र असल्याचेही ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : योगी-भागी संदर्भातील मतपरिवर्तन संशोधनाचा विषय, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -