घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींनी आतापर्यंत १०३ कोटींचं केलं दान; PM Cares फंडाला दिली एवढी...

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत १०३ कोटींचं केलं दान; PM Cares फंडाला दिली एवढी रक्कम

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बचतीतून आणि वैयक्तिक वस्तूंचा लिलाव करुन जी रक्कम जमा झाली, त्यातील १०३ कोटींपेक्षा अधिक रक्कम दान केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत सार्वजनिक कामांसाठी १०३ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी, गंगा साफ करण्यासाठी तसंच कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पीएम केअर्स फंड यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडात २.२५ लाख रुपयांची देणगी दिल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींसाठीची शिक्षण योजना आणि स्वच्छ गंगा मिशन यासारख्या अनेक योजनांसाठी देणगी दिली आहे. मोदींनी बचतीतून आणि वैयक्तिक वस्तूंचा लिलाव करुन जी रक्कम जमा झाली, त्यातील १०३ कोटींपेक्षा अधिक रक्कम दान केली आहे.

२०१९ मध्ये पंतप्रधानांनी कुंभमेळ्यात सुरक्षा कर्मचार्‍यांसाठी तयार केलेल्या कॉर्प्स फंडाला त्यांच्या वैयक्तिक बचतीतून २१ लाखांची देणगी दिली. जेव्हा त्यांना दक्षिण कोरियामध्ये शांती पुरस्कार देण्यात आला, तेव्हा त्यांनी स्वच्छ गंगा मिशनसाठी १.३ कोटींची रक्कम देण्याची घोषणा केली होती. त्याशिवाय नुकताच त्यांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा लिलाव झाला, यामधून ३.४० कोटी रुपये जमा झाले होते. नमामि गंगे अभियानाला ही रक्कम दिली जात आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावाची जाहिरात केली. सुरतमध्ये लिलाव झाला, त्यामध्ये ८.३५ कोटी जमा झाले. नमामि गंगे अभियानात हा निधी देण्यात आला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना कार्यकाळ संपल्यावर त्यांनी गुजरातमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी वैयक्तिक बचतीतून २१ लाखांची देणगी दिली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करुन त्यामधून मिळालेली रक्कम कन्या केलावनी फंडाला दिली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -