देशातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधानांसोबत महत्त्वाची बैठक

कोरोनाच्या संकटामुळे भारतात लॉकडाऊन असल्याने देशातील अर्थव्यवस्था पार कोलमडून गेली आहे. त्या पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्रात हालचाली सुरू आहेत. देशातील सशस्त्र दलाच्या अल्प आणि दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, संरक्षण उद्योगांना सुनिश्चित करण्यासाठी संभाव्य सुधारणांकरता सध्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रमुखे नेते आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीत ऑर्डनन्स कारखान्यांचे कामकाज सुधारणे, खरेदी प्रक्रिया सुलभ करणे, संसाधनांवर लक्ष केंद्रीत करणे, अनुसंधान व विकास, नवनिर्मितीला प्रोत्साहन देणे, संरक्षण तंत्रज्ञानातील गुंतवणूक आकर्षित करणे अशा विविध विषयांवर चर्चा केली जात आहे.

बैठकीला सर्व महत्त्वाचे मंत्री, अधिकारी उपस्थित

या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री यांच्यासह भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत पंतप्रधानांनी संरक्षण आणि वायू दलातील डिझाईनपासून ते उत्पादनापर्यंतच्या जगातील अव्वल देशांमध्ये स्थान निश्चित करण्यावर भर दिला आहे. तसेच स्वावलंबन व निर्यातीची दुहेरी उद्दीष्टे पूर्ण करणाऱ्या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर देण्याच्या सुचना यावेळी केल्या आहेत. संरक्षण क्षेत्रात देशीविदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रस्तावित सुधारणांचा आढावा त्यांनी घेतला.

मेक इन इंडियाला पुढे आणा – पंतप्रधान 

अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची रचना, विकास आणि निर्मितीसाठी देशांतर्गत क्षमता वाढवण्यासाठी भारताने आयातीवर जास्त अवलंबून राहू नये. तसेच “मेक इन इंडिया” पुढे आणावा, असे पंतप्रधानांनी यावेळी निर्देश दिले. जागतिक संरक्षण उत्पादनांच्या मूल्य शृंखलेमध्ये उद्योगाच्या सहभागासह संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी, अनुसंधान आणि विकास यांना प्रोत्साहन देणाऱ्या वातावरण, नवनिर्मितीला पुरस्कृत करणारा भारतीय निर्माण करण्यावर त्यांनी या बैठकीत भर दिला आहे.

हेही वाचा –

Breaking: रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन कोरोना पॉझिटिव्ह