घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटBreaking: रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन कोरोना पॉझिटिव्ह

Breaking: रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. आज त्यांनी स्वतः याबाबत घोषणा केली. मिखाइल आता सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले आहेत. राष्ट्रध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये मिखाइल यांनी, मी कोरोना पॉझिटिव्ह झालो असल्याचे सांगितले.

मिखाइल यांनी आपल्या संसर्गाबाबत माहिती देताना सांगितले की, मी आता स्वतःला अलगीकरण करुन घेतले आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत आहे. माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या सुरक्षेकरता हे करणे गरजेचे आहे. मात्र महत्त्वाच्या सर्व कामासाठी मी उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान मिखाईल यांनी उप पंतप्रधान अँड्रे बेलासॉ यांना प्रभारी पंतप्रधान म्हणून काम पाहायला सांगितले आहे. मिखाईल यांच्याशी बातचीत करताना पुतिन म्हणाले की, तुमच्यासोबत जे झाले आहे, “ते कुणाच्याही सोबत घडू शकते. सरकारच्या कामकाजात तुम्ही लवकरच भाग घेऊ शकाल, अशी मी आशा करतो. तुमच्या सूचना आणि सहभागाशिवाय सरकार चालवणे अशक्य आहे.”

रशियामध्ये कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या १ लाख ६ हजार आहे. तर आतापर्यंत १ हजार ७३ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. असे सांगितले जाते की, रशियात संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आणखी वाढू शकते. कारण कोरोनाची चाचणी करण्याची संख्या सध्या कमी आहे. तसेच अनेक कोरोनाबाधितांना लक्षणे दाखवत नसल्यामुळे खरा आकडा समोर येत नाहीये. रशियातील अनेक राज्यात मार्चच्या शेवटी लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ११ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -