घरदेश-विदेशरुग्णवाहिकेला जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवला स्वतःचा ताफा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

रुग्णवाहिकेला जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवला स्वतःचा ताफा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर ते मुंबई दरम्यान चाललेली वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला. ते या ट्रेनमधून गांधीनगर ते अहमदाबादच्या कालूपूर स्थानकापर्यंत गेले.

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून गुजरात दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी मोदी अहमदाबादहून गांधीनगर येथे जात होते. त्यावेळी एका रुग्णवाहिकेला जाता यावं याकरता मोदींनी आपला ताफा थांबवून रस्ता मोकळा करून दिला आहे.

हेही वाचा – काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चुरस, मल्लिकार्जून खर्गे यांनी भरला उमेदवारी अर्ज

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जात असताना एक रुग्णवाहिका रस्त्यावर थांबलेली त्यांना दिसली. यावेळी त्यांनी तत्काळ आपल्या सुरक्षा रक्षकांना सांगून आपला ताफा थांबवला आणि रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. यावेळी काही काळ मोदींचा ताफा थांबून राहिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर ते मुंबई दरम्यान चाललेली वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला. ते या ट्रेनमधून गांधीनगर ते अहमदाबादच्या कालूपूर स्थानकापर्यंत गेले.

- Advertisement -


ट्रेनला हिरवा कंदील दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जागतिक व्यापार मागणीनुसार देशात काही नवीन शहरांची निर्मिती केली जात आहे. तसंच, जुन्या शहरांचा विकास आणि त्यांच्या विस्तारासाठी लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. गांधीनगर-अहमदाबादच्या धर्तीवर देशातील जुळ्या शहरांचा विकास करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन

१५ ऑगस्ट २०२१ रोजी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ७५ आठवड्यांदरम्यान ७५ वंदे भारत गाड्या देशाच्या कानाकोपऱ्याला जोडल्या जातील अशी घोषणा केली होती. त्यानुसार आतापर्यंत दोन ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. वेग, सुरक्षा आणि सेवा या तीन तत्त्वांवर या एक्स्प्रेस चालवल्या जात आहेत.

वंदे भारत एक्सप्रेस जास्तीत जास्त 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. यात शताब्दी ट्रेनप्रमाणे ट्रॅव्हल अपार्टमेंट्स आहेत. प्रवाशांना या ट्रेनमध्ये प्रवासाचा चांगला अनुभव मिळेल. वेग आणि सोयीच्या दृष्टीने ही ट्रेन भारतीय रेल्वेसाठी मोठी झेप आहे. या ट्रेनचा प्रवास वेळ 25 टक्क्यांवरून 45 टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे.

हेही वाचा – वेग, सुरक्षा आणि सेवेची हमी! देशाला मिळाली तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस, जाणून घ्या वैशिष्ट्य

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -