घरताज्या घडामोडीकोरोनाला आळा घालण्यासाठी स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोनची आवश्यकता - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनाला आळा घालण्यासाठी स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोनची आवश्यकता – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज(गुरूवार) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. देशभरातील ३० मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागणार नाही. कारण अर्थव्यवस्था रूळावर ठेवायची असेल तर स्थानिक पातळीवर कन्टेंन्मेंट झोन तयार करून कोरोनावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

होम आयसोलेशच्या गाईडलाईन्स पाळणं आवश्यक

स्थानिक पातळीवरील कंटेन्मेंटवर झोनवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी रूग्णांची मोठ्या प्रमाणात वाढतेय. त्या ठिकाणी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली पाहीजे. याशिवाय होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त ट्रीटमेंट करण्यात येईल, यावर लक्ष देणं आवश्यक आहे. होम आयसोलेशच्या गाईडलाईन्स आणि नियम पाळणे गरजेचे आहे. होम आयसोलेशनदरम्यान टेस्टिंग आणि ट्रेसिंगची उपलब्धता वाढवावी. त्यामुळे हॉस्पिटलमधील रूग्णांची संख्या कमी होण्यास मोठी मदत होईल.

- Advertisement -

केंद्र सरकार प्रत्येक राज्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी

केंद्र सरकारने टेली मेडीसीनसाठी अनेक सोईसुविधा उपलब्ध केल्या आहेत. या मेडिसीनचा उपयोग कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना होऊ शकतो. केंद्र सरकार प्रत्येक राज्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. पाच ते सहा महिन्यांपूर्वी २३ हजार कोटींचं जे पॅकेज देण्यात आलं होतं. त्याचा सदुपयोग करत अनेक राज्यांनी आरोग्य सुविधा पायाभूत केल्या आहेत. तसेच देशभरात मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रूग्णालय मुलांसाठी ८०० पेक्षा अधिक पिडियाट्रीक केअर युनिट्स स्वीकृत केल्या आहेत. जवळपास दीड लाख ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्स तयार केले जात आहेत. पाच हजारांपेक्षा अधिक अॅम्ब्युलन्स आणि ९०० पेक्षा अधिक लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज टँकबाबत कॅपेसीटी जोडण्यात आलीय.

कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याला व्हेरियंटपेक्षाही अधिक तयारी करावी लागणार आहे. ओमिक्रॉनसह अजून काही येणाऱ्या व्हेरियंटसाठी आपल्याला तयार रहावं लागणार आहे. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी एका सरकारकडून दुसऱ्या सरकारची मदत करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे घरीच योग्य उपचार मिळाल्यास वैद्यकीय सेवेवर ताण येणार नाही, असं मोदी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : West Bengal Train Accident: बिकानेरहून गुवाहाटीला जाणारी एक्स्प्रेस रुळावरून घसरली; ३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -