घरदेश-विदेशPM Modi Diwali With Soldiers: पंतप्रधान म्हणून नाही तर कुटुंबातील एक सदस्य...

PM Modi Diwali With Soldiers: पंतप्रधान म्हणून नाही तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून आलोय, पंतप्रधान मोदींनी साधला नौशेरातील जवानांसोबत संवाद

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा नौशेरातील सीमेवर तैनात जवानांना दिवाळीनिमित्त भेटण्यासाठी नौशेरा सेक्टर दौऱ्यावर पोहचले आहे. यावेळी नौशेरावर तैनात जवानांची भेट घेत संवाद साधला तसेच जवांनाच्या शौर्याचे कौतुक  केले. यावेळी बोलताना मोदींनी पंतप्रधान म्हणून नाही तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून आलोय, असं म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी जवानांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत पुढे म्हटले की, माझ्या कुटुंबियांसोबत मी दिवाळी साजरी करण्यासाठी आलोय. देशाचे जवान हेच माझे कुटुंबीय आहेत. मी तुमच्या कुटुंबाचा भाग आहे. मी पंतप्रधान म्हणून आलो नाही तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून आलो आहे. कुटुंबियांना भेटताना ज्या भावना असतात तशाच भावना मला तुम्हाला भेटताना असतात. देशाची संविधानिक जबाबदारी सांभाळतोय. यापूर्वी गुजरातावासियांनी मला संधी दिली यानंतर देशवासियांनी दिली. मात्र मी प्रत्येक दिवाळी मी माझ्या कुटुंबाचा भाग असलेल्या जवानांसोबत साजरी केली. आज पुन्हा तुमच्याकडून एक नवीन ऊर्जा, नवीन उमंग, नवी विश्वास घेऊन जाण्यासाठी आलोय.

“मी एकटा नाही आलो मी माझ्यासोबत १३० कोटी भारतीयांची आशीर्वाद घेऊन आलोय. आज सायंकाळी दिवाळीनिमित्त एक दिवा जवानांच्या वीरतेसाठी शौर्यासाठी, पराक्रम, त्याग तपश्चर्यासाठी आणि प्रत्येक जवानाला शुभेच्छा देण्यासाठी पेटवला जाईल, आज तुम्ही कुटुंबियांसोबत बोलाल. फोटो पाठवाल. आणि नक्कीच म्हणाल यंदाची दिवाळी काही वेगळीच होती.” असंही पंतप्रधान म्हणाले.

- Advertisement -

“”देशाचे वीर जवान, मुली भारत मातेची अशाप्रकारे सेवा करतायत असे भाग्य अनेकांच्या नशिबी नसतं. आपल्या चेहऱ्यावरील मजबूत भावना मला दिसतायतं. तुम्ही सर्व मजबूत इच्छेशक्तीने परिपूर्ण आहात.” असेही पंतप्रधान म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -