घरट्रेंडिंगBreaking: बँक खाते, शाळा, मोबाईलसाठी आधारसक्ती नाही - सुप्रीम कोर्ट

Breaking: बँक खाते, शाळा, मोबाईलसाठी आधारसक्ती नाही – सुप्रीम कोर्ट

Subscribe

आधारला वैधानिक दर्जा देण्याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे. न्यायधीश ए. के. सिकरी यांनी खंडपीठाच्यावतीने यावरील निर्णयाचे वाचन केले. खासगी कंपन्या किंवा मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्या ग्राहकांच्या आधार कार्डची सक्ती करु शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सिकरी यांनी दिला आहे. आधार कार्ड सुरक्षित असून यामुळे गोरगरिबांना अनेक सरकारी योजनांचा लाभ होत आहे आणि त्यांची ओळक आधार कार्डमुळे झाली असल्याचे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. तसेच आधार पुर्णपणे सुरक्षित असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. आधार कायद्यातील कलम ५७ कोर्टाने रद्द केले आहे. कोणत्याही खासगी कंपनीला आधारचा डेटा शेअर करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सिकरी यांनी वाचून दाखवला आहे.

मुळात आधारने नागरिकांची थोडीशीच माहिती गोळा केलेली आहे. आधार कार्डचे डुप्लिकेशन करता येत नाही, त्यामुळे नागरिकांच्या गोपनीयतेला कोणताही धोका नसल्याचे कोर्टाने नमूद केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -