घरदेश-विदेशCongress Sankalp Satyagraha : राजघाटावर प्रियंका गांधी म्हणाल्या- या देशाचा पंतप्रधान कायर

Congress Sankalp Satyagraha : राजघाटावर प्रियंका गांधी म्हणाल्या- या देशाचा पंतप्रधान कायर

Subscribe

राजघाटावरील सत्याग्रह सभेत प्रियंका गांधींनी राहुल गांधींवरील कारवाईवरून केंद्र सरकारला जोरदार चपराक दिलीय.

नवी दिल्ली – राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे आज (रविवारी) देशभरात संकल्प सत्याग्रहाचं आंदोलन (Sankalp Satyagrah) सुरू केला आहे. सकाळी १० वाजल्यापासून सर्व राज्यांतील जिल्हा आणि विभाग स्तरावरील कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरात हे आंदोलन केलं जात आहे. दिल्लीतील राजघाटावरील सत्याग्रहाला पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) उपस्थित आहेत. राजघाटावर पोहोचल्यानंतर प्रियंका गांधी यांनी पहिल्या रांगेत बसलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर तिखट शब्दात वार केले आहेत.

- Advertisement -

राजघाटावरील सत्याग्रह सभेत प्रियंका गांधींनी राहुल गांधींवरील कारवाईवरून केंद्र सरकारला जोरदार चपराक लगावली आहे. “राहुल (गांधी) यांनी प्रश्न उपस्थित केल्याने भाजप घाबरला आहे, ज्यांची उत्तरे त्यांच्याकडे (भाजप) नाहीत. एखाद्या व्यक्तीला दाबण्यासाठी हे षडयंत्र रचलं जातं हे हास्यास्पद आहे. ज्या संसदेत माझ्या शहीद वडिलांचा अपमान होतो, तिथे शहीद पंतप्रधानांच्या मुलाला मीर जाफर म्हणतात. माझ्या संपूर्ण गांधी कुटुंबाचा अपमान झाला आहे, संपूर्ण काश्मिरी समाजाच्या चालीरीतींचा अपमान झाला आहे, पण त्यानंतरही त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाही.” असा आरोपही यावेळी प्रियंका गांधींनी केला आहे. तसंच माझ्या कुटुंबाने त्यांच्या रक्तानं या देशातील लोकशाहीचे सिंचन केलं आहे, असं वक्तव्य देखील प्रियंका गांधींनी केलंय.

- Advertisement -

तसंच या देशाचा पंतप्रधान भित्रा आहे, माझ्यावर काय गुन्हा दाखल करायचे ते करा आणि मला तुरुंगात टाकायचं तर टाका, असं आव्हान देखील यावेळी प्रियंका गांधींनी केंद्र सरकारला दिलंय.

यावेळी त्यांनी ३२ वर्षापूर्वीचा एक किस्सा देखील सांगितला. १९९१ साली मे मध्ये त्यांच्या वडिलांची अंत्ययात्रा तीन मूर्ती भवनातून निघाली होती. त्यांची आई आणि भाऊ गाडीत बसले होते. समोर फुलांनी भरलेला भारतीय सैन्याचा ट्रक होता, यावर त्यांचा वडिलांचा मृतदेह होता. काफिला थोडा वेळ पुढे गेला, त्यावेळी राहुल गांधींनी त्याला खाली उतरायचं आहे असं सांगितलं. याला त्यांच्या आईने नकार दिला. राहुल गांधींनी हट्ट केला, त्यावेळी प्रियंका गांधींनी त्याला उतरू द्या असं सांगितलं. राहुल गांधी गाडीतून खाली उतरले आणि आर्मीच्या ट्रकच्या मागे चालू लागल. कडाक्याच्या उन्हात तीन मूर्तींपासून वडिलांच्या अंत्ययात्रेच्या मागे चालत चालत ते राजघाटावर पोहोचले. “या ठिकाणापासून ४००-५०० मीटर अंतरावर माझ्या भावाने माझ्या शहीद वडिलांचे अंत्यसंस्कार केले.”, असं प्रियंका गांधींनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -