घरदेश-विदेशप्रियंका गांधींची गुजरातच्या गांधीनगरमधून पहिली जाहीर सभा

प्रियंका गांधींची गुजरातच्या गांधीनगरमधून पहिली जाहीर सभा

Subscribe

तुमची जागृकता हिच खरी देशभक्ती आहे. तुमचे वोट हे एक शस्त्र आहे. हेच शस्त्र तुम्हाला मजबूत बनवणार असल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी गुजरातमध्ये मंगळवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर गांधीनगर येथे काँग्रेसची सभा झाली. या सभेमध्ये काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पहिल्यांदाच जनतेला संबोधित केले. गांधीनगरमध्ये प्रियंका गांधी यांची पहिली जाहीर सभा झाली. या सभे दरम्यान त्यांनी जनतेला जागृक राहण्याचे आवाहन केले आहे. निवडणुक काळात तुम्हाला अनेक आश्वासने दिली जातील मात्र तुम्ही जागृक राहुन तुमच्या मतदानाचा अधिकार बजवा. कारण तुमचे मत हे एक शस्त्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सरकारने दिलेले आश्वासनं गेली कुठे?

या सभे दरम्यान प्रियंका गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. जनेतेने या सरकारला अनेक प्रश्व विचाले पाहिजे. मोठी मोठी आश्वासन देणाऱ्या या सकारला विचारला की, दिलेले आश्वासन तुम्ही पूर्ण केले का? दोन लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिलेले गेले कुठे? १५ लाख तुमच्या खात्यात येणार होते ते गेले कुठे? महिलांची सुरक्षितता गेली कुठे ? असे प्रश्न तुम्ही सरकारला विचारा. भावनिक मुद्द्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बोला असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तुमचे वोट हे शस्त्र आहे

आज देशात जे चालले आहे त्याचे खूप दुख: होत आहे. तुमची जागृकता हिच खरी देशभक्ती आहे. तुमचे वोट हे एक शस्त्र आहे. हेच शस्त्र तुम्हाला मजबूत बनवणार आहे. या निवडणुकीतून तुम्ही तुमचे भविष्य निवडणार आहे त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या असे आवाहन प्रियंका गांधी यांनी जनतेला केले आहे. तुमची जागृकता या काळात खूप महत्वाची आहे. येणाऱ्या काळात अनेक निर्णय घ्या, अनेक प्रश्न विचारा कारण हा देश तुम्ही बनवला आहे. हा देश शेतकऱ्यांनी, महिलांनी आणि तरुणांनी बनवला आहे. त्यामुळे या देशाची रक्षा तुम्हीच करु शकता, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -