घरAssembly Battle 2022Punjab Election 2022: पंजाब निवडणुकीमध्ये पाच प्रमुख जागांसाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला,...

Punjab Election 2022: पंजाब निवडणुकीमध्ये पाच प्रमुख जागांसाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, जाणून घ्या

Subscribe

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. पंजाबमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. या निवडणुकीत अकाली दलाने पहिल्यांदाच भाजपची साथ सोडली आहे. अकाली दलने बसपासोबत युती केली आहे. तसेच भाजपा कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस आणि ढींडसा यांच्या पक्षाने युती केली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये या निवडणुकीसाठी जोरदार टक्कर होताना पहायला मिळणार आहे. परंतु पंजाबमध्ये कोणत्या पाच प्रमुख जागा आहेत. हे आज आपण जाणून घेऊयात…

पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले नेते प्रकाशसिंग बादल वयाच्या ९५ व्या वर्षीही निवडणुकीच्य रिंगणात उभे आहेत. ते पुन्हा एकदा नशीब आजमावत आहे. बादल हे देशातील सर्वात जुन्या नेत्यांपैकी एक आहेत. पंजाबमधील ते आतापर्यंतचे सर्वात वयस्कर उमेदवार आहेत. आपने बादल यांना गुरमीत खुड्डिया येथून उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने जगपाल सिंग अबूलखुराना यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या जागेवरून ७ उमेदवार रिंगणात उभे आहेत.

- Advertisement -

अमृतसर ईस्ट –

या मतदारसंघातून १० उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंग सिद्धू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अकाली दलचे नेता विक्रम मजीठिया यांना निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने जगमोहन सिंग राजू यांना उमेदवारी दिली आहे. राजू हे तामिळनाडू कॅडरचे आयएएस होते. या जागेवर सिद्धू आणि मजिठिया आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलंय.

- Advertisement -

चमकौर साहिब –

मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणाऱ्या चरणजीत सिंग चन्नी यांना चमकौर साहिब येथून उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवरून ९ उमेदवार लढणार आहेत. आम आदमी पार्टीने चरणजीत सिंग चन्नी आणि अकाली दल-बसपा यांनी युती करून हरमोहन सिंग यांना तिकिट देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार चन्नी यांना काँटे की टक्कर देणार आहेत. चन्नी यांना भदोर म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे. आम आदमी पार्टीने लाभ सिंग उघोके आणि अकाली दलने सतनाम सिंग यांना तिकिट देण्यात आली आहे.

पटियाला अर्बन –

माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग येथून लढत आहेत. या मतदार संघातून १७ उमेदवार रिंगणात आहेत. आपने माजी महापौर अजितपाल कोहली यांना उमेदवारी दिली आहेत. तर महापौर विष्णू शर्मा यांना काँग्रेसकडून तिकिट देण्यात येणार आहे. काँग्रेसमधून वेगळे झाल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस पक्षाची स्थापना केली आहे.

जलालाबाद –

जलालाबाद येथून १५ उमेदवार रिंगणात आहेत. जलालाबादमधून अकाली-बसपा युतीचे मुख्यमंत्री चेहरा सुखबीर बादल रिंगणात आहेत. काँग्रेसने मोहन सिंग फलियानवाल यांना तर आम आदमी पक्षाने जगदीप कंबोज यांना तिकीट दिले आहे.

धुरी –

धुरी या मतदारसंघातून आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा भगवंत मान हे निवडणूक लढवत आहेत. येथून एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. अकाली दलाने प्रकाश चंद गर्ग आणि काँग्रेसने दलवीर सींग गोल्डी यांना तिकिट दिले आहेत.


हेही वाचा : Kerala : दोन दिवसांपासून खोल दरीत अडकलेल्या मुलाची अखेर सुटका; ‘या’ अवलियाचं धाडस अंगलट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -