घरदेश-विदेशइंधनाच्या किंमती कमी करा; राहुल गांधीचे मोदींना ट्विटर चँलेंज

इंधनाच्या किंमती कमी करा; राहुल गांधीचे मोदींना ट्विटर चँलेंज

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटपटू विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज स्विकारले आहे. त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी सुध्दा मोदींना पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याचे चॅलेंज दिलंय. मोदीजी तुम्ही विराट कोहलीचे चॅलेंज स्विकारले याचा मला आनंदच आहे. आता माझंही चॅलेंज स्विकारा आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करुन दाखवा असं आव्हान राहूल गांधी यांनी केलंय. राहुल गांधी यांनी #FuelChallenge या हॅशटॅगसहित ट्विट करुन मोदींना चॅलेंज केलंय.

- Advertisement -

पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या काही दिवसापासून भडकले आहेत. देशभरातून या दरवाढीवर संताप व्यक्त केला जातोय. यातच या संतापाला राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून वाट मोकळी करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करा, अन्यथा आम्ही देशभरात आंदोलन करु आणि दरकपात करण्यास तुम्हाला भाग पाडू. आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहे” असं ट्विट करत राहूल गांधी यांनी मोदींना चॅलेंज केलंय.

राज्यवर्धन राठोड यांचे फिटनेस चॅलेंज
केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सोशल मीडियावरुन फिट इंडियाची मोहिम सुरु केली आहे. त्यांनी स्वत:चा व्यायाम करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर त्यांनी विराट कोहली, हृतिक रोशन आणि सायना नेहवाल यांना हे चॅलेंज दिलं होतं. या तिघांनीही हे चॅलेंज पूर्ण केलं. विरोट कोहली याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी आणि अनुष्का शर्मा यांना टॅग करत चॅलेंज दिले होते. मोदींनी हे चॅलेंज स्वीकार केल्याचे म्हटलं होतं. यानंतर राहूल गांधी यांनी ही संधी साधत थेट मोदींना चॅलेंज केलंय.

- Advertisement -

इंधन दरवाढीचा भडका सोशल मीडियावर
राहुल गांधींनी #FuelChallenge हॅशटॅग वापरुन ट्विट करताच इंधन दरवाढीचा भडका सोशल मीडियावरही उडाला. अनेक लोकांनी हॅशटॅग वापरुन भाजपची सोशल मीडियावर टर उडवली आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -