घरताज्या घडामोडीभारत जोडो यात्रा : लोकांमध्ये उत्साह.., सुरक्षा त्रुटीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

भारत जोडो यात्रा : लोकांमध्ये उत्साह.., सुरक्षा त्रुटीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

Subscribe

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सध्या संपूर्ण लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. या यात्रेत चालताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची एका तरुणाने गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भातील व्हिडीओ देखील समोर आला. दरम्यान, राहुल गांधींनी सुरक्षा त्रुटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

पंजाबमध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, सध्या लोकांमध्ये खूप उत्साह दिसून येत आहे. तरूणाने जे केले त्याला सुरक्षेतील त्रुटी म्हणू नका. त्यावेळी कोणतीही सुरक्षा त्रुटी नव्हती. सुरक्षा व्यवस्थेने त्याला लगेच बाजूला केले, असं राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तरुणाने सुरक्षा भेदलेली नाही. तर लोकांना राहुल गांधींना भेटायचे आहे. राहुल गांधीदेखील लोकांना भेटत आहेत. यावेळी तो तरुण खूप उत्साही होता. याच उत्साहातून त्याने राहुल गांधी यांची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला, असं राजा वारिंग म्हणाले.

- Advertisement -

आज राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पंजाबच्या होशियारपूरमध्ये होती. राहुल गांधी होशियारपूरच्या दसुहामध्ये पदयात्रा करत असताना अचानक एक तरुण सुरक्षा तोडून त्यांच्याजवळ आला. त्याने राहुल गांधींची गळाभेट घेतली. सर्व काही इतक्या वेगाने घडले की, सुरक्षा रक्षकाला काहीच समजले नाही. मात्र, राहुल गांधी यांच्या आसपास असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी त्या तरुणाला तात्काळ दूर केले.

सुरक्षा यंत्रणांची योजना काय?

राहुल गांधी 19 जानेवारी रोजी लखनपूरमध्ये प्रवेश करतील आणि तेथे रात्री थांबल्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी कठुआच्या हातली मोर येथून पुढे जातील. पुन्हा रात्री चडवळ येथे ही यात्रा थांबेल. 21 जानेवारीला सकाळी हिरानगर ते दुग्गर हवेलीच्या दिशेने यात्रा निघेल आणि 22 जानेवारीला विजयपूर ते सटवारीकडे जाईल.

काश्मीरमधील काही भाग संवेदनशील आहेत, त्यामुळे अशा प्रस्तावित भागांतून राहुल गांधी यांनी पायी यात्रा करण्यापेक्षा वाहनाने प्रवास करावा. तसंच, फक्त ओळखीच्या लोकांनाच सोबत ठेवावे असा सल्ला सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.


हेही वाचा : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना सुरक्षा यंत्रणांकडून अलर्ट, काश्मीरमध्ये पायी चालण्यावर निर्बंध


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -