घरदेश-विदेशजयपूर साखळी बॉम्बस्फोटातील चारही दोषींची राजस्थान उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

जयपूर साखळी बॉम्बस्फोटातील चारही दोषींची राजस्थान उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

Subscribe

२००८ मध्ये जयपूरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील चार दोषींची निर्दोष मुक्तता करण्याक आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाकडून हा निकाल देण्यात आला आहे.

जयपूरमध्ये घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटा संबंधातील महत्त्वपूर्ण निकाल आज (ता. २९ मार्च) देण्यात आला आहे. या बॉम्बस्फोटातील चार दोषींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. या प्रकरणातील मृत्यू संदर्भासह दोषींनी सादर केलेल्या २८ अपीलांवर न्यायालयाकडून हा निकाल देण्यात आला. त्यामुळे या घटनेतील दोषींसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी ठरली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाकडून न्यायमूर्ती पंकज भंडारी आणि न्यायमूर्ती समीर जैन यांच्या खंडपीठाकडून या प्रकरणाचा निकाल देण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात एक अल्पवयीन मुलगा देखील दोषी आढळला होता. त्या अल्पवयीन मुलाचे प्रकरण हे ज्युवेनाईल बोर्डाकडे पाठवण्यात आले आहे.

याआधी २०१९ मध्ये या प्रकरणाचा जयपूरच्या कनिष्ठ न्यायालयाकडून निकाल देण्यात आला होता. त्यावेळी या साखळी बॉम्बस्फोटातील पाच दोषींपैकी एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. तर UAPA च्या अंतर्गत चार आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. त्यावेळी जयपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने निकाल देताना मोहम्मद सैफ, सरवर आझमी, सैफुर रहमान आणि एका अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. तर शाहबाज हुसेन या एका आरोपीची त्यावेळी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. दरम्यान, हे सर्व आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?
१३ मे २००८ मध्ये राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आठ बॉम्बस्फोट झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण जयपूर हादरून गेले होते. या बॉम्बस्फोटात ७१ जणांनी आपला जीव गमवावा लागला होता. तर १७६ जण जखमी झाले होते. यानंतर या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी दहशतवादविरोधी पथक म्हणजेच ATS ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर राजस्थानच्या ATS ने पाच जणांना अटक केली होती. दरम्यान, जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात राजस्थान ATS ने एकूण ११ दहशतवाद्यांची नावे दिली होती. तर नंतर पाच आरोपींना अटक करण्यात आली होती.


हेही वाचा – मुंबईत दहा वाहनतळांमध्ये लवकरच इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -