घरताज्या घडामोडी1 एप्रिलपासून UPI पेमेंट महागणार, सामान्य लोकांच्या व्यवहारावर काय होणार परिणाम?

1 एप्रिलपासून UPI पेमेंट महागणार, सामान्य लोकांच्या व्यवहारावर काय होणार परिणाम?

Subscribe

येत्या 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. यासह आता UPI पेमेंट्सद्वारे व्यवहार देखील महागणार आहेत. त्यामुळे देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) UPI ला व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीए) शुल्क लागू करण्यास सांगितले आहे. त्याच्या परिपत्रकानुसार, 2000 रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल. हे शुल्क वापरकर्त्याला व्यापारी व्यवहारांसाठी भरावे लागणार आहे.

NPCI ने आपल्या परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे की, या बदलाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. बँक खात्यांशी जोडलेल्या UPI व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ते पूर्वीप्रमाणे पूर्णपणे विनामूल्य आहेत. इंटरचेंज चार्ज आकारल्यास सर्वसामान्यांच्या खिशावर कोणताही परिणाम होणार नाही. इंटरचेंज शुल्क व्यापाऱ्याकडून वॉलेट किंवा कार्ड जारीकर्त्याला दिले जाते. अशा परिस्थितीत, 2000 रुपयांपेक्षा कमी पैसे देणाऱ्या व्यापाऱ्यावर त्याचा परिणाम होणार नाही.

- Advertisement -

प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सद्वारे UPI पेमेंटसाठी 1.1% इंटरचेंज शुल्क आकारले जाईल. पीपीआयमध्ये व्यवहार वॉलेट किंवा कार्डद्वारे होतो. इंटरचेंज फी ही सामान्यतः कार्ड पेमेंटशी संबंधित असते आणि व्यवहार स्वीकारणे, त्यावर प्रक्रिया करणे किंवा मंजूर करणे यासाठी शुल्क आकारले जाते.

लागू झालेला चार्ज कोण भरणार?

- Advertisement -

Wallets/PPI साठीच हा फक्त प्रस्ताव आहे. जर तुम्ही वॉलेटमधून 2 हजारांपेक्षा जास्त व्यवहार केले तर तुम्हाला इंटरचेंज शुल्क आकारले जाऊ शकते. परंतु हे शुल्क व्यापाऱ्याकडून घेतले जाईल. म्हणजेच, जर तुम्ही वॉलेट, क्रेडिट कार्ड यांसारख्या प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) द्वारे UPI पेमेंट केले तर तुम्हाला इंटरचेंज फी भरावी लागेल.


हेही वाचा : आम्ही वाट पाहतोय… 2024मधील विरोधी पक्षांच्या भूमिकेवर नितीश कुमारांनी दिले संकेत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -