मोदींनी योगींच्या खांद्यावर हात ठेवून काय चर्चा केली? राजनाथ सिंहांनी केला उलगडा

rajnath singh reveal discussion of photo Modi hands on yogi shoulders
मोदींनी योगींच्या खांद्यावर हात ठेवून काय चर्चा केली? राजनाथ सिंहांनी केला उलगडा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी योगींच्या खांद्यावर हात ठेवून चर्चा करताना दिसत आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबाबत विरोधकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. यावरच देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोदी-योगींमध्ये काय चर्चा झाली याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगींना धडाधड काम करायला सांगितले असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सीतापुर दौऱ्यावर होते. यावेळी संबोधित करताना सिंह यांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये काय संवाद झाला याबाबतची माहिती दिली आहे. राजनाथ सिंह यांनी युपीमधील कायदा सुव्यवस्था आणि विकासाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केलं आहे. तसेच लोकांना म्हणाले की, तुम्ही सोशल मीडियावर एक फोटो पाहिला असेल. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगींच्या खांद्यावर हात ठेवला आहे. ते चर्चा करत आहेत. विरोधकांमध्ये या फोटोवरुन चर्चा सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगींच्या खांद्यावर हात ठेवून काय चर्चा केली? याचा उलगडा राजनाथ सिंह यांनी केला आहे. या फोटोबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, मोदींनी योगींसोबत काय चर्चा केली हे तुम्हाला मी सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सांगितले की, अशीच जोरदार बॅटिंग करत राहा म्हणजेच असेच लोकहिताची कामे सुरु ठेवा असे मोदींनी सांगत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

अखिलेश यादव आणि काँग्रेसने साधला होता निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला होता. जगासाठी सत्तेसाठी कधी असं करावं लागते, पश्चातापाने खांद्यावर हात ठेवून काही पावलं चालावे लागत आहे असा घणाघात अखिलेश यादव यांनी केला होता.


हेही वाचा : नव्या Covid-19 व्हेरीयंटमुळे Alert ! केंद्राची राज्यांसाठी नवी नियमावली