अकासा एअरलाईन्सचं पहिलं विमान उड्डाणासाठी सज्ज; तिकीट बुकिंग सुरु

अकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी प्रवीण अय्यर म्हणाले की, अकासा एअर देशभरात आपले जाळे निर्माण करणार असून ते मेट्रोला टियर 2 आणि टियर 3 शहरांशी जोडले जाईल

rakesh jhunjhunwalas akasa air open bookings for flights

राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीचे अकासा एअर (Akasa Air) कंपनीचं पहिलं व्यावसायिक विमान उड्डाणासाठी सज्ज झालं आहे. हे विमान 7 ऑगस्ट 2022 पासून मुंबई ते अहमदाबादला (Mumbai To Ahmedabad) उड्डाण करणार आहे. या दोन्ही शहरांदरम्यान विमान कंपनी आठवड्याभरात 28 उड्डाणे चालवेल. दरम्यान अकासा एअर फ्लाइट्सच्या तिकिटांची बुकिंगला 22 जुलै 2022 पासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे. इतर फ्लाईट्सच्या तुलनेत अकासा एअरचे तिकीट दर 5 ते 7 टक्क्यानी स्वस्त आहे. अकासाच्या सर्व फ्लाईटसच्या तिकीट विक्रीसाठी बुकिंग सुरु झाली आहे.

यानंतर कंपनी 13 ऑगस्टपासून बेंगळुरु आणि कोचीदरम्यान 28 उड्डाणे चालवेल. कंपनीने सुरुवातीच्या टप्प्यात अहमदाबाद, बंगळुरु, मुंबई आणि कोची नेटवर्कसाठी तिकीटांची विक्री सुरु झाली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, मुंबई- अहमदाबाद मार्गावर बोईंग 737 मॅक्स विमानाचे व्यावसायिक उड्डाणे सुरु होतील. मुंबई- अहमदाबाद मार्गावरील किमान एकतर्फी भाडे 3,948 रुपये असेल, असे एअरलाईन्सचे म्हणणे आहे. या मार्गावरील इतर विमान कंपन्यांचे भाडे 4,262 रुपये आहे. अकासा एअरला बोईंगकडून पहिले विमान मिळाले असून दुसरे विमान या महिन्याच्या अखेरीस मिळणे अपेक्षित आहे.

अकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी प्रवीण अय्यर म्हणाले की, अकासा एअर देशभरात आपले जाळे निर्माण करणार असून ते मेट्रोला टियर 2 आणि टियर 3 शहरांशी जोडले जाईल. तसेच दर महिन्याला दोन नवीन विमाने ताफ्यात समाविष्ट केली जातील, त्यानंतर टप्प्याटप्प्याने नेटवर्कचा विस्तार करताना आणखी शहरे जोडली जातील.


जॉबसाठी रिजेक्ट होताच महिलेने पाठवला भन्नाट ई-मेल; लगेच आला एचआरचा कॉल