घरताज्या घडामोडी40 वर्षापूर्वी झालेल्या 'या फाशीची इतिहासात नोंद, फाशी दिल्यानंतरही दोन तास जिवंत

40 वर्षापूर्वी झालेल्या ‘या फाशीची इतिहासात नोंद, फाशी दिल्यानंतरही दोन तास जिवंत

Subscribe

फाशी दिल्यानंतरही दोषी व्यक्ती चक्क दोन तास जिवंत होती. त्याचे नाव होते रंगा (कुलजीत सिंह).

फाशी म्हंटल की भल्या भल्या गुन्हेगारांच्या अंगाला घाम फुटतो. पण आजच्याच दिवशी 40 वर्षांपूर्वी तिहार जेलमध्ये 31 जानेवारी 1982 साली एका दोषीला देण्यात आलेल्या फाशीची इतिहासात नोंद झाली आहे. कारण फाशी दिल्यानंतरही दोषी व्यक्ती चक्क दोन तास जिवंत होती. त्याचे नाव होते रंगा (कुलजीत सिंह). गीता चोप्रा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोन दोषींपैकी रंगा हा एक होता. पण फाशी दिल्यानंतरही दोन तास तो जिवंत होता.

नेमके काय होते प्रकरण?

- Advertisement -

1978 साली गीता चोप्रा आणि संजय चोप्रा या बहीण भावाची रंगा (कुलजीत सिंह) आणि बिल्ला (जसबीर सिंह) या दोघा कुप्रसिद्ध गुन्हेगारांनी अपहरण आणि हत्या केली होती. ऑल इंडीया रेडीयोवरील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गीता भाऊ संजयबरोबर जात होती. त्यावेळी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने रंगा आणि बिल्ला या दोघांनी खंडणीच्या उद्देशाने त्यांना कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. पण त्यांचे वडील नौदलात अधिकारी असल्याचे कळाल्यानंतर आपण पकडले जाऊ या भीतीने बिल्ला आणि रंगा यांनी गीता आणि संजयची हत्या केली. पण हत्येआधी त्यांनी गीतावर सामूहीक बलात्कार केला.

या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. सर्वोच्च न्यायालयाने 7 एप्रिल 1979 साली उपलब्ध पुराव्याच्या आधारावर बिल्ला आणि रंगाला फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर चार वर्षानंतर 31 जानेवरी 1982 साली तिहार जेलमध्ये या दोघांना फाशी देण्यात आली. त्यासाठी तिहार जेल प्रशासनाने फरीदकोट आणि मेरठ जेलमध्ये 2 जल्लाद फकीर आणि कालू यांना बोलावले होते. बिल्ला आणि रंगा क्रूर गुन्हेगार होते. पण फासावर जाणार या विचाराने त्यांची झोप उडाली होती. 31जानेवारी 1982 ला पहाटे दोघांना चहा देण्यात आला. तसेच यावेळी शेवटची इच्छाही त्यांनी व्यक्त केली नव्हती. दोघेही प्रचंड तणावात होते. त्यानंतर जल्लाद फकिरा आणि कल्लूने दोघांचा चेहरा काळ्या फडक्याने झाकला. त्यावेळी मात्र बिल्लाला रडू कोसळले. तर रंगा मात्र ‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल’ असे म्हणाला. त्यानंतर जल्लादांनी खटका खेचला आणि दोघांच्या गळ्याला फासाचा दोर आवळला गेला. त्यानंतर ठराविक वेळेसाठी दोघांचा मृतदेह फासावर तसाच लटकवत ठेवण्यात आला. नियमानुसार दोन तासानंतर पोस्टमार्टेमसाठी दोघांचे शव खाली उतरवण्यात येणार होते. पण त्याआधी डॉक्टरांनी फासावर लटकत असलेल्या बिल्लाची नाडी तपासली. तेव्हा तो मृत झाल्याचे जाहीर करण्यात आले. पण रंगाची नाडी मात्र सुरू होते. याचा अर्थ फाशी देऊनही तो जिवंत होता. या घटनेने तिहार जेलमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर गार्डने रंगाचे पाय खेचले त्यामुळे त्याच्या गळ्याभोवतीचा फास आणखीन घट्ट आवळला गेला. त्यानंतर रंगा आणि बिल्ला यांना मृत घोषित करण्यात आले.

- Advertisement -

पण या घटनेने रंगाच्या फाशीच्या शिक्षेची इतिहासात नोंद झाली. कारण त्याआधी कधीही फाशी देण्यात आलेली व्यक्ती जिवंत असल्याची घटना घडली नव्हती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -