घरदेश-विदेशतुमच्या रेशनकार्डमध्येही 'ही' चुकीची माहिती आहे का? असेल तर होणार ५ वर्ष...

तुमच्या रेशनकार्डमध्येही ‘ही’ चुकीची माहिती आहे का? असेल तर होणार ५ वर्ष तुरूंगवास

Subscribe

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सरकार प्रत्येक रेशन कार्डधारकाला दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ दोन ते तीन रुपयांच्या कमी किंमतीवर उपलब्ध आहे. दारिद्र्य रेषेच्या खाली म्हणजेच बीपीएल कार्ड आणि अत्ंयोदय कार्डधारकांना सरकारकडून अधिक रेशन देण्यात येते, अशा परिस्थितीत लोकं शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड तयार करू लागले असून सरकारही यासाठी पुढाकार घेत आहे. तुम्हालाही रेशनकार्ड मिळवायचं असेल किंवा कोणाचे नाव घ्यायचे असेल तर बनावट कागदपत्रे वापरू नका अन्यथा ते तुम्हाला अडचणीचे ठरू शकते आणि तुरुंगवास, दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. खोट्या बनावट माहितीचे रेशनकार्ड तयार केले तर ते नियमांविरूद्ध आहे. अशी चुकीची माहिती तुमच्या रेशनकार्ड संदर्भात असेल तर सावधान…

या सेवेच्या अटी पूर्ण होत नसल्याने बऱ्याच वेळा लोकं या दारिद्र वर्गाचे बनावट रेशन कार्ड तयार करून घेतात. त्यासाठी ते बनावट कागदपत्रे सादर करतात किंवा इतर काही पद्धत अवलंबून त्यांना बीपीएल किंवा अत्ंयोदय वर्गाचे रेशन कार्ड तयार करण्यासाठी गैर मार्गाचा वापर करतात. बनावट रेशन बनविणे हे अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हा आहे, परंतु आता त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. बनावट रेशनकार्ड असणारे कोणीही दोषी आढळल्यास त्याला पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा, दंड किंवा दोन्हीसह शिक्षा होऊ शकते.

- Advertisement -

तुमच्याकडे रेशन कार्ड नसले तरीही तुम्ही ते ऑनलाइन बनवू शकतात. रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी प्रत्येक राज्याने एक वेबसाइट तयार केली आहे. तुम्ही राज्याचे नागरिक असाल तर त्या राज्याच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाचे नाव पालकांच्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट आहे. परंतु १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक स्वतःसाठी स्वतंत्र रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतात.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -