Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सौंदत्तीचे रेणुका देवी मंदिर पुन्हा एकदा बंद

सौंदत्तीचे रेणुका देवी मंदिर पुन्हा एकदा बंद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत उत्तर कर्नाटकाचे शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौंदत्ती रेणुका देवीचे मंदिर पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Story

- Advertisement -

उत्तर कर्नाटकाचे शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौंदत्ती रेणुका देवीचे मंदिर पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे हा महत्त्वाचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. याआधी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले सात ते आठ महिने मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीत घट होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सौंदत्ती रेणुका देवीचे मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

याकरता घेण्यात आला निर्णय

महाराष्ट्र, कर्नाटकातील आराध्य दैवत असणाऱ्या सौंदत्ती रेणुका देवी मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. विशेष म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकांची संख्या ही अधिक असते. पण, सध्या महाराष्ट्रात आणि कर्नाटकात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने रेणुका मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

मंदिर खुले ठेवल्यास देवीच्या दर्शनासाठी अनेक भक्त गर्दी करणार. त्यातच सोशल डिस्टन्सिंग देखील भक्तांकडून पाळले जाणार नाही. त्यामुळे सध्या मंदिर बंदच ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन याबाबत मंदिर प्रशासनाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाविकांना देवीच्या दर्शनासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.


हेही वाचा – ‘माझा फोन टॅप होतोय’; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ


- Advertisement -

 

- Advertisement -