घरCORONA UPDATECoronavirus: भारतात कोरोना विषाणूच्या ३० लसींवर संशोधन चालू

Coronavirus: भारतात कोरोना विषाणूच्या ३० लसींवर संशोधन चालू

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी लसीच्या विकासासाठी नेमलेल्या टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीनंतर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूच्या लसीचा विकास, औषध शोध, क्लिनिकल स्क्रीनिंग आणि चाचणी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांच्या सद्य स्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या निवेदनात म्हटलं आहे की, देशातील कोरोनाविरूद्ध ३० लसींचा विकास विविध टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी या लसीच्या विकासासाठी नेमलेल्या टास्क फोर्सची बैठक घेतली. ही टास्क फोर्स जागतिक महामारीच्या कोविड-१९ च्या औषध, उपचार आणि चाचणीवर काम करत आहे. संबंधित प्रयत्न शिक्षण, उद्योग आणि सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोरोनाला पराभूत करण्यासाठी काही मोठे प्रयत्न केले जात आहेत.

उत्तम समन्वय आणि वेगाने काम करुन ही प्रक्रिया पुढे नेता येईल, अशी पंतप्रधानांना आशा होती. या संकटाच्या काळात जे शक्य आहे ते आपल्या नियमित वैज्ञानिक कार्याचा भाग बनले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. काही कोरोना लस काही चाचण्यांसाठी तयार आहेत आणि काही पुढील महिन्यापर्यंत या टप्प्यात पोहोचतील.

- Advertisement -

हेही वाचा – आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये त्रुटी, ९ कोटी वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात; फ्रेंच हॅकरचा दावा


दरम्यान, देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ४९ हजार ३९१ वर पोहोचला आहे. तर १ हजार ६९४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १४ हजार १८३ जण बरे झाले आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. असं असलं तरी भारताचा डबलींग रेट सुधारला असल्याचं आरोग्यमंक्ष्यांनी सांगितलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -