घरताज्या घडामोडीझांबियामध्ये 27 संशयित इथिओपियन स्थलांतरितांचे मृतदेह आढळले, बंद ट्रकमध्ये गुदमरल्याचा संशय

झांबियामध्ये 27 संशयित इथिओपियन स्थलांतरितांचे मृतदेह आढळले, बंद ट्रकमध्ये गुदमरल्याचा संशय

Subscribe

झांबियाची राजधानी लुसाका येथे रविवारी 27 जणांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे सर्व मृतदेह इथिओपियन नागरिकांचे असल्याचे समजते. पोलिसांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.

झांबियाची राजधानी लुसाका येथे रविवारी 27 जणांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे सर्व मृतदेह इथिओपियन नागरिकांचे असल्याचे समजते. पोलिसांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी अधिक तपासाला सुरूवात केली आहे. (rest of world lifeless and asphyxiated bodies of 27 suspected ethiopian migrants found in zambian capital lusaka)

या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपपोलीस जनसंपर्क अधिकारी डेनी मवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तपास केला असता असे समोर आले की, 20 ते 38 वयोगटातील सर्व पुरुषांचे मृतदेह काही अज्ञात व्यक्तींनी लुसाका येथील एनजीवेरेरे भागात फेकून दिले होते. हे सर्व इथिओपियन नागरिक असल्याचे समजते. दरम्यान, एकूण 28 जण होती. त्यामुधील 27 जणांचा मृत्यू झाला असून, एक व्यक्ती अद्याप जिवंत आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या या 27 मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. तसेच, हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. हे मृतदेह विद्यापीठाच्या शिक्षण रुग्णालयाच्या शवागारात नेण्यात आले आहेत. पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, हे सर्वजण परप्रांतीय असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, श्वास गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला असून, मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह ट्रकमधून फेकल्याचे समजते. यापैकी फक्त एकच व्यक्ती जिवंत होता, त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.

- Advertisement -

लुसाका पोलिसांनी सांगितले की, सर्व 28 जण 20 ते 38 वयोगटातील आहेत. या मृतदेहांजवळ सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे असे मानले जाते की सर्व स्थलांतरित इथिओपियामधून आले होते. तसेच, ते झांबियाच्या प्रदेशातून जात होते.

ऑक्टोबर महिन्यात मलावीमधील अधिकार्यांना सामूहिक कबरीत इथिओपियन स्थलांतरितांचे 25 मृतदेह सापडले होते. त्यावेळी, मलावी पोलिसांना माजी राष्ट्रपती पीटर मुथारिका यांच्या सावत्र मुलाचा गुन्ह्याशी संबंध असल्याचे पुरावे सापडले.

झांबियाची लोकसंख्या 18 दशलक्ष आहे आणि ते अनेक वर्षांपासून अवैध मानवी तस्करीशी लढत आहे. युनायटेड नेशन्स निर्वासित एजन्सी नुसार, (UNHCR) झांबियाने काँगो, बुरुंडी, अंगोला आणि रवांडा सारख्या शेजारील देशांतील 105,000 हून अधिक निर्वासितांचे आयोजन केले आहे.


हेही वाचा – RSS देशातील प्रत्येक गावात उघडणार शाखा; मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -