घरदेश-विदेशसंयुक्त सेवांचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील २० उमेदवार यशस्वी

संयुक्त सेवांचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील २० उमेदवार यशस्वी

Subscribe

संरक्षण मंत्रालयाच्या विविध सेवांकरिता घेण्यात आलेल्या ल्या एकत्रित परिक्षांचा निकाल आज जाहीर झाला आहे. देशभरातील १७२ उमेदवरांची निवड झाली असून महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या विविध सेवांकरिता घेण्यात आलेल्या ल्या एकत्रित परिक्षांचा निकाल आज जाहीर झाला आहे. देशभरातील १७२ उमेदवरांची निवड झाली असून महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये १७पुरुष उमेदवार व ३ महिला उमेदवारांचा यात समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाच्या विविध सेंवांकरिता उमेदवारांच्या निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१८ मध्ये लेखी परिक्षा घेतली होती. लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतल्या असून आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. देशातील १३० पुरुष व ४२ महिला अशा एकूण १७२ उमेदवारांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्रातील निवड झालेल्या पुरुष उमेदवारांची नावे

देशातील १३० पुरुष उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील पुढील एकूण १७ उमेदवारांचा समावेश आहे. मयुर मनोहर हिवळे(९), योगेश शिवाजी वानवे (१८), सिध्देश कावळकर (२२), विनोद राजेंद्र शिंदे (५१), ओंकार दिगंबर उधान (५७), अक्षय बब्रुवाहन टाळके (६१),अनिवेश अरविंद होळे (६४), मयुर राजेश तलवाले (८१), अभिजीत दत्तात्रय ताम्हणकर (९०), रिषभ भारत भालेराव (९६), कैवल्य सतिश कुळकर्णी (९८), हर्षवर्धन अनिल चव्हाण (१०९), उदित हेमंत देसाई (११०), संकेत भरत जाधव (११५), भरत शंकर गंटी (११७), अभिनव प्रधान (११९), श्रेयस बब्रुवाहन पाटील (१३०).

- Advertisement -

निवड झालेल्या महिला उमेदवारांची नावे

देशातील ४२ महिला उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील पुढील एकूण तीन उमेदवारांचा समावेश आहे. प्रिती पवार (५) राधिका सतिश तळेकर (७) अन्वेशा प्रधान(२५).

निवड झालेल्या उमेदवरांचे एप्रिल पासून प्रशिक्षण

निवड झालेले पुरुष उमेदवार संरक्षण मंत्रालयाच्या चेन्नई स्थित अधिकारी प्रशिक्षण संस्थेच्या १०९ व्या शॉर्ट सर्विस कमिशन कोर्स मध्ये सहभागी होतील तर महिला उमेदवार याच संस्थेच्या २३व्या शॉर्ट सर्विस कमिशन कोर्स मध्ये सहभाग घेतील. हा प्रशिक्षण कार्यक्रम एप्रिल २०१९ पासून सुरु होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -