घरदेश-विदेशRJD नेत्याच्या हत्येनंतर दोघांना ठेचून मारलं

RJD नेत्याच्या हत्येनंतर दोघांना ठेचून मारलं

Subscribe

बिहारमधील नालंदा येथे आरजेडी नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बिहारमधील नालंदा येथे आरजेडी नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाईकवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून ही हत्या केली. त्यानंतर नालंदामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला. नालंदा हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जिल्ह्या म्हणून ओळखला जातो. इंदाल पासवान असं हत्या करण्यात आलेल्या आरजेडी नेत्याचं नाव आहे. इंदाल पासवान यांच्या हत्येनंतर नालंदामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर जमावानं राज कुमार आणि रंजन या दोघांना ठेचून मारलं. नालंदामधील मगध सराई गावातील दिप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हत्या करण्यात आली. अंत्यसंस्कारावरून इंदाल पासवान हा घरी परतत होते. त्यावेळी हल्लेखोरांनी इंदाल पासवान यांची गोळ्या झाडून हत्या केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंदाल पासवान यांची हत्या हा नियोजित कट होता. गोळ्या झाडल्यानंतर इंदाल यांचा जागीच मृत्यू झाला. इंदाल पासवान यांची हत्या करण्यात आल्यानंतर जमावानं संशय आल्यामुळे नरेश चौधरी आणि चुन्नी लाल यांची घरं देखील पेटवून दिली.

चोख पोलीस बंदोबस्त 

इंदाल पासवान यांची हत्या करण्यात आल्यानंतर परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पासवान यांच्या कुटुंबानं नरेश चौधरी आणि चुन्नी लाल यांच्यावर संशय असल्याचं सांगितलं. काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये भांडणं झाली होती. त्यातून ही हत्या करण्यात आली असावी असा आरोप देखील पासवान यांच्या घरच्यांनी केला आहे. दरम्यान, इंदाल पासवान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरदार रूग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी एआयआर दाखल करण्यात आला असून प्रकरणाच्या तपासाला देखील सुरूवात करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -