Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर रोबोट वाचवणार पर्यटकांचे जीव

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर रोबोट वाचवणार पर्यटकांचे जीव

Subscribe

गोव्याच्या समुद्रकिना-यावर कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोटची व्यवस्था करण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यावर घडणाऱ्या घटना टाळण्यासाठी आणि समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांचे जीव वाचवण्यासाठी या रोबोटची मदत घेण्यात येणार आहे. ज्यामुळे याठिकाणी घडणाऱ्या घटनांना आळा देखील बसेल.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोटची गोव्याच्या समुद्रकिना-यावर सुरक्षिततेसाठी निवड करण्यात आली आहे. हा रोबोट समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांचे जीव वाचवण्याचे काम करेल अशी माहिती देण्यात आली आहे. राज्य-नियुक्त जीवरक्षक संस्था असलेल्या दृष्टी मरीनने नुकतेच ऑरस, स्वतः बोट चालवू शकणार रोबोट आणि ट्रायटन, तसेच एक एआय मॉनिटरिंगच्या स्वरूपातील कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला रोबोट आणला आहे. यामुळे समुद्रकिनारी घडणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

लाइफगार्ड संघटना दृष्टी मरीनने सांगितले की, गेल्या दोन वर्षात किनारपट्टी भागात 1 हजारपेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक घटना या समुद्रामध्ये पर्यटकांच्या बुडण्याच्या घटना आहेत. ट्रायटनने आतापर्यंत 19 हजार तासांचा रनटाइम पूर्ण केला आहे. यामध्ये असलेल्या दोन्ही एआय निरीक्षण कॅमेरा आधारित प्रणाली आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवू शकतात. तसेच ते चुकीच्या घडणाऱ्या घटनांचे मूल्यांकन करून त्यांना शोधू शकतात. यासह, ऑन-ड्युटी लाईफगार्ड्ससोबत या रोबोटद्वारे वास्तविक वेळेची माहिती सामायिक केली जाऊ शकते. जेणेकरून ते चुकीच्या घटना टाळण्यासाठी जलद प्रतिक्रिया देऊ शकतील.

- Advertisement -

पर्यटकांना सतर्क करून समुद्रकिनारी असलेल्या जीवरक्षकांना मदत करण्यासाठी दृष्टी वर्क्सने विकसित केलेले ऑरस राज्याच्या समुद्र्किनाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यास मदत करतील. ऑरस हा एक स्वतः बोट चालवू शकणारा रोबोट आहे, जो जीवरक्षकांना मदत करण्यासाठी निर्मित करण्यात आला आहे. ज्याद्वारे पर्यटकांना पोहोण्याची परवानगी नसलेल्या भागात गस्त घालणे, भरतीच्या वेळी पर्यटकांना सावध करणे, तसेच विविध समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या जीवरक्षकांना मदत करण्यासाठी या रोबोटचा वापर करण्यात येणार आहे.

हेही वाचा – PNB बँक घोटाळ्यातील एकमेव महिला आरोपीला जामीन मंजूर, ५ वर्षांनी तुरुंगातून सुटका 

- Advertisement -

ऑरस आपत्कालीन परिस्थितीत जीवरक्षकांसोबत गस्त घालण्यापासून ते बहुभाषिक माहिती देण्यापर्यंत काम करेल. याव्यतिरिक्त, एआय बॉटमध्ये 100 किलोचा पेलोड आहे आणि म्हणूनच यामुळे लॉजिस्टिक सपोर्ट व्हेइकल हा दुप्पट होतो. दरम्यान, आतापर्यंत ऑरसने 110 तासांचे स्वायत्त कार्य पूर्ण केले असून, समुद्रकिनाऱ्यावर सुमारे 130 किलोमीटरचे अंतर सुद्धा पार केले आहे.

- Advertisment -