घरताज्या घडामोडीRussia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात भारत महासत्तेचे केंद्र का बनला?, काय...

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात भारत महासत्तेचे केंद्र का बनला?, काय आहे तज्ज्ञांचे मत

Subscribe

रशिया-युक्रेन युद्धात भारत महासत्तेच्या केंद्रस्थानी आहे. दोन देशांचे युद्ध सुरु असताना सगळ्या देशांचे लक्ष भारतावर केंद्रीत झाले आहे. भारतासाठी हा काळ अग्निपरीक्षेचा ठरणार आहे. प्रमुख देशांचे राजकीय विश्लेषक भारताच्या परराष्ट्र धोरणावरुन आपापल्या हितांसाठी प्रभावित करण्यात व्यस्त आहेत. भारताने सुरुवातीपासूनच हे स्पष्ट केले आहे की रशिया-युक्रेन युद्धादरम्यान आपले परराष्ट्र धोरण तटस्थ आहे आणि राहील. यासह, भारताचे परराष्ट्र धोरण राष्ट्रीय हिताच्या अनुषंगाने स्वतंत्र आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी भारताचा दौरा केला आणि भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये संकटात मॉस्को मदतीसाठी उभा असल्याचे आश्वासन दिलं आहे. यादरम्यान अमेरिकेचे डेप्युटी एनएसए दलीप सिंह सुद्धा भारताच्या दौऱ्यावर होते. दलीप सिहं यांनी जाता जाता भारताला कडक शब्दात इशारा दिला आहे. तसेच चीनचे परराष्ट्र मंत्रीसुद्धा भारत दौऱ्यावर होते. यामुळे भारत महासत्तांचे केंद्र का बनला आहे? अशी चर्चा सुरु झाली आहे. या मागे कारण आहे ते म्हणजे भारत रशिया आणि युक्रेनच्या युद्धात मध्यस्थी होऊ शकतो का? रशिया-युक्रेनच्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी भारताच्या धोरणाचे कौतुक का केले?

प्रो हर्ष वी पंत यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई यांच्या भारत दौऱ्यावर रशिया, अमेरिकेसह सर्वच प्रमुख देशांच्या नजरा लागल्या होत्या. त्यांचा दौरा अनेक कारणांमुळे चर्चेत होता. सर्गेई यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस जय शंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अलीकडे भारताला भेट देणाऱ्या पाहुण्यांपैकी ते पहिले व्यक्ती होते. ज्यांना पंतप्रधान मोदी यांनीही भेट दिली होती. डिप्लोमॅटिक कॉरिडॉरमध्ये ही चर्चा विशेष होती. याआधी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत दौऱ्यात ते पंतप्रधान मोदींना भेटू शकले नव्हते. एवढेच नाही तर, अमेरिकन राजनैतिकाचा दौराही परराष्ट्र मंत्रालयापुरता मर्यादित होता.

- Advertisement -

रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारत दौऱ्यादरम्यान चीन-भारत संघर्षावर वक्तव्य केले आहे. भारत आणि चीनमधील संबंध बिघडू नये यासाठी रशिया नेहमीच प्रयत्न करत राहील. तसेच इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनला रोखण्यासाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या क्वाड गटामुळे रशिया चीनच्या भारताबद्दलच्या शंका दूर करण्याचाही प्रयत्न करण्यात येईल. रशिय परराष्ट्र मंत्र्यांचे बोलणे हवेत नाही कारण रशिया, भारत, चीन या देशांची RIC संस्था याला आधार देते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री यांची भेट अत्यंत महत्त्वाची होती. लावरोव यावेळी पंतप्रधान म्हणाले की, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी भारत कोणतेही योगदान देण्यास तयार आहे. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा संदेशही मोदींना दिला. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा संदेशही मोदींना दिला. यामुळे रशिया-युक्रेन वादात भारत मध्यस्थी करू शकतो असे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले आहे. या भेटीमध्ये भारत तटस्थ भूमिकेत असल्याचे दाखवण्यात आले. राशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरणावरुन कौतुक केले होते.

- Advertisement -

आरआयसीचे वैशिष्ट्ये असे आहे की, भारत आणि चीनमधील संघर्षात RIC एका सुतेसारखे काम करत आहे. चीन आणि रशिया यांच्यात भागिदारी आहे. तर नवी दिल्ली आणि मॉस्कोमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अलीकडच्या काळामध्ये चीन डोकालाम ते गलवानपर्यंत अनेकवेळा युद्ध झाले आहेत. रशियाने चीन आणि भारत यांच्यातील समतोल साधण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे.


हेही वाचा : Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड; दोन AK-47 रायफल जप्त

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -